पुणे- मध्यरात्रीनंतर आलेल्या एका अज्ञात भरधाव वाहनाने पादचाऱ्याला उडविले आणि या पादचाऱ्याला गंभीर जखमी करून हा वाहनचालक पसार झाला यात पादचाऱ्याचा मृत्यू झाला.लोणीकंद पोलीस ठाण्यात या प्रकरणी
निलेश जगताप, वय ४२ वर्षे, रा. वाघोली ता. हवेली जि.पुणे यांनी फिर्याद नोंदविली आहे.दि.१८/०६/२०२४ रोजी रात्रौ १२/०० वा. ते स.०६/०० वा. चे सुमा. आरंभ अमृततुल्य चे समोर आव्हाळवाडी वाघोली रोड वाघोली ता. हवेली जि.पुणे येथे यातील आरोपीने त्याचे ताब्यातील वाहन हे वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने, अविचाराने व भरधाव वेगात चालवुन, नमुद ठिकाणी फिर्यादी यांचे नातेवाईक नवनाथ केरबा सातव, वय ४० वर्षे रा. डोमखेलवस्ती वाघोली ता. हवेली जि.पुणे हे नमुद ठिकाणाहुन पायी जात असताना त्यांना जबर ठोस मारून, गंभीर जखमी करून, त्याचे मृत्युस कारणीभुत होवुन, अपघाताचे ठिकाणी न थांबता, अपघाताची खबर न देता पळुन गेला. सहा.पो.निरी. श्री.रविद्र गोडसे मो. नं ८०८२०७७१०० अधिक तपास करत आहेत
वाघोली रोडवर मध्यरात्रीनंतर भरधाव वाहनाने उडविले -पादचाऱ्याचा जागीच मृत्यू
Date: