हिंसाचार रोखण्यासाठी लोकसहभाग आवश्यक-
मुंबई: वसई येथे सकाळी दि. १८ जून रोजी घडलेली संतापजनक, दुःखद आणि दुर्देवी घटनेत परिचित व्यक्तीनेच एका तरुण महिलेवर प्राणघातक वार केला. लोखंडाच्या माराने झालेला हा हल्ला तरुणीच्या जीवाला धोका निर्माण करणारा ठरला. सदर प्रसंगी मदत करण्या ऐवजी आसपासचे नागरिक पाहत बसले ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे.
महिला हिंसाचार थांबावा यासाठी लोकसहभाग वाढवण्याच्या दृष्टीने स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा या नात्याने आम्ही ‘झिरो टॉलरन्स टू ऑल टाइप्स ऑफ व्हायोलेन्स अगेन्स्ट विमेन्स’ अशी मोहीम हाती घेतली होती. महिलांचे अत्याचार सहन केल्या जाणार नाही यासाठी पोलिसांनी संपुर्ण महाराष्ट्रातून देखील लोक सहभाग वाढुन भूमिका घ्यावी असे मत डॉ नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले त्याच बरोबर राज्याचे पोलिस महासंचालक श्रीमती. रश्मी शुक्ला व विशेष पोलिस महानिरीक्षक, कोकण विभाग श्री. संजय दराडे यांचा निवेदनाद्वारे सुचित करण्यात आले
वेळ पडल्यास संरक्षणासाठी महिलांना हत्यार देण्यात यावी असे देखील त्या म्हणाल्या. पोलिस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांच्या बडीकॅाप योजने अंतर्गत सर्वसामान्य नागरिक देखील कॉन्स्टेबल च्या माध्यमातून स्व संरक्षणासाठी प्रयत्न करू शकतात. लोकांचे धैर्य वाढवून वेळ प्रसंगी ते मदतीला धावले पाहिजे यासाठी पोलिसांनी आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे. सोबतच आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी उपसभापती म्हणून देखील पाठपुरावा करेल असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.