पुणे-खडकी शिक्षण संस्थेच्या आलेगावकर प्राथमिक विद्यालय व पी पी एम बाल शिक्षण मंदिरात विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत
आज खडकी शिक्षण संस्थेत पी पी एम बाल शिक्षण मंदिरात विद्यार्थ्यांचे मिरवणूक काढून औक्षण करून तसेच त्यांचे पहिले पाऊल कागदावर उमटून स्वागत केले. यावेळी पी पी एम बाल शिक्षण मंदिराचे अध्यक्ष राजेंद्र भुतडा तसेच सदस्य सुधीर फेगसे संचालक अजय सूर्यवंशी, मधुकर टिळेकर सर इत्यादी मान्यवर स्वागतासाठी उपस्थित होते. तसेच आलेगावकर माध्यमिक विद्यालयाचे प्रामुख्याध्यापक मोहन लोणकर सर जी एम आय कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका ललिता काकडे मॅडम व आळंदी येथून भागवत आचार्य सचिन जाधव महाराज यांनी विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत केले. सुरुवातीला पी पी एमचे संचालिका सौ शुभांगी बरेलु व आलेगावकर प्राथमिक विद्यालयाच्या जयश्री माखर मॅडम यांनी औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यानंतर पीपीएमबाल शिक्षण मंदिराच्या वंदना शिवशरण व आलेगावकर प्राथमिक विद्यालयाचे किशोर मुदनवार सर यांनी मुलांचे पहिले पाऊल कागदावर घेऊन त्यांचा शाळेत प्रवेश करून घेतला.. नंतर सरस्वती पूजन करून घेताना आलेगावकर प्राथमिक विद्यालयाचे चंद्रकांता सोनकांबळे, विमल घोलप, मीना बरुड इत्यादी मान्यवर उपस्थितीत. संचालक सुधीर फेंगसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन केले. त्यानंतर पीपीएम शिक्षण व आलेगावकर प्राथमिक विद्यालयाने केलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन करून पालक व विद्यार्थ्यांना सदर प्रदर्शन खुले करण्यात आले, या प्रदर्शनात संस्थेत शिकवत असलेल्या साहित्याचे सुबक व आकर्षक मांडणी केली होती याची माहिती संस्थेचे शिक्षक पालक व विद्यार्थ्यांना देत होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटून व आनंद उत्सव साजरा करण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांचे सेल्फी पॉइंट द्वारे आकर्षक फोटोसेशन करण्यात आले. ज्यावेळी आलेले भागवत आचार्य सचिन जाधव महाराज यांनी विद्यार्थ्यांना शुभ आशीर्वाद दिले व कार्यक्रमाचे नियोजनचे कौतुक केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पी पीएम बाल शिक्षण मंदिराचे सौ शुभांगी बरेलु, वंदना शिवशरण ,हेमा आहेर तसेच आलेगावकर प्राथमिक विद्यालयाचे जयश्री मार, किशोर मुदनवार, चंद्रकांता सोनकांबळे, मीना बरूड व विमल घोलप यांनी विशेष परिश्रम घेतले शेवटी संस्थेचे संचालक व पीएमपीएल बाल शिक्षण मंदिराचे अध्यक्ष राजेंद्र भुतडा यांनी सर्व शिक्षक व पालक यांचे आभार व्यक्त केले.
