पुणे-नऱ्हे भाग महानगरपालिकेत जाऊनही भौतिक सुविधाची वानवा सुरूच आहॆ.अक्षरक्ष रस्त्यावरून सांडपाणी वाहत आहॆ.महानगरपालिका प्रशासन ढिम्म झाले असून नऱ्हे भागातील समस्यांकडे त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष सुरू आहॆ.यावर ताबडतोब कारवाई करावी अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते ,खडकवासला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्य. अध्यक्ष भूपेंद्र मोरे यांनी दिला आहॆ.
नागरिकांच्या समस्येला वाव देण्यासाठी “नऱ्हेकरांच्या समस्यांचे पोस्टमार्टम” ह्यां सदराखाली नागरी बैठक व पत्रकार परिषद बँक ऑफ महाराष्ट्र नऱ्हे येथे आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
मागील काही वर्षांपासून रस्त्यावर वाहणारे ड्रेनेज अस्ताव्यस्त कचरा नादुरुस्त रस्ते भंयकर वाहतूक कोंडी ग्रामपंचायत क्षेत्रांतील नवीन मालमता नोंदी अनेक समस्येला नऱ्हेकर सामोरे जातं आहॆ.विषयी आमरण उपोषण केले असता 8 महिन्यात प्रश्न निकाली काढू असे आश्वासन मनपा प्रशासनाने दिले होते.मात्र अजूनही त्यां समस्या जैसे थेचं आहेत.
वाढीव मालमत्ता कर ,शास्तीकर, रस्त्यांची दुरावस्था ,उन्हाळ्यात होणारी पाणी कपात मान्य पण आमच्या नळाला वर्षभर पाणीच नाही त्यामुळे टॅंकर माफियांचा सुळसुळाट व होणारे अपघात
टाळायला हवेत.स्वामी नारायण मंदिर ते नवले पुल येथे होणारे रोजचे अपघात व मृत्यु नाल्यातून वाहणारे ओपन ड्रेनेज त्यामुळे पसरणारी दुर्गंधी व आरोग्य समस्या उद्भवत आहेत.
ह्यां समस्याना वाचा फोडावी ह्यां उद्देशानं ही नागरी बैठक बोलावण्यात आली असल्याचे मोरे यांनी सांगितले.सत्तेत असलो तरीही जनतेच्या समस्येला वाव मिळत नसेल तर जनतेसाठी रस्त्यावर उतरायला आपण तयार आहोत.ह्यां भागात कोणताही नगरसेवक वा शासकीय समिती सदस्यही नाहीत यामुळे ह्यां समस्यांचे निराकरण करणार कोण ?हा प्रश्न आहॆ.सर्वाधिक महसूल देऊनही नऱ्हेकरांच्या माथी समस्याचा प्रसाद मिळत असेल तर यावर नऱ्हेकर एकत्रित येऊन व्यापक उग्र आंदोलन करून महानगरपालिका प्रशासनास वठणीवर आणू असा इशाराही त्यानी दिला आहॆ.
यावेळी राजाभाऊ जाधव हरीश वैद्य आनंद थेऊरकर, संकेत चाचुर्डे , प्रशिक दारुंडे, सुरज दांगडे तसेच नागरीक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रस्त्यावरून नद्यां वहाव्यात अशा पध्दतीनं रोज ड्रेनेज वाहत आहेत् त्यामुळे नागरीक अक्षरशः आजारी पडण्याचा धोका संभवतो आह़े .मलमपट्टी करण्यापेक्षा यावर कायमस्वरूपी तोडगा काढणं गरजेचे आहॆ.असे मोरे यांनी म्हटले आहे.