बीव्हीजी कृषी तंत्रज्ञानाने मुळशीत सेंद्रिय भात उत्पादनाचा टक्का वाढवणार : हणमंतराव गायकवाड

Date:

बीव्हीजी कृषी तंत्रज्ञानाने मुळशीत सेंद्रिय भात उत्पादनाचा टक्का वाढवणार : हणमंतराव गायकवाड

पौड (प्रतिनिधी) : मुळशी तालुक्यातील चवदार भात पिकाची मागणी वाढते आहे. परंतू हेच भात पिक सेंद्रिय पद्धतीने केले, तर जगभरात या भात पिकाला बाजारपेठ मिळेल. बीव्हीजी कृषी तंत्रज्ञानाच्या वापराने सेंद्रिय भात पिकाचे भरघोस उत्पादन घेता येणे शक्य आहे. त्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक व बीव्हीजी परिवार  पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांनी केले. 
पौड येथे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे उपाद्यक्ष सुनिल चांदेरे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, सदस्य व परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

गायकवाड म्हणाले, “बीव्हीजीच्या वतीने विषमुक्त शेती व कॅन्सर मुक्त अभियान देशभरात राबवले जात आहे. या अभियानाला जोड देण्यासाठी बीव्हीजीच्या वतीने सेंद्रिय शेतमाल निर्मितीसाठी विविध खते औषधांचे निर्माण केले जाते. याच सेंद्रिय कृषी निविष्ठांचा वापर करुन देशातील हजारो शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतमालाचे भरघोस उत्पादन मिळवले आहे. रासायनिक खते औषधांच्या वारेमाप वापरामुळे कॅन्सरचे रुग्ण वाढत आहे. कॅन्सर  सारख्या भयावह आजारावर सुद्धा बीव्हीजीने औषध निर्माण केले आहे. अभिनेता संजय दत्त यांचा कॅन्सर बीव्हीजी औषधांनी बरा झाला आहे.”

गायकवाड पुढे म्हणाले, “शेती माणूस व पशुधन ही पृथ्वीवरची बलस्थाने आहेत. शेती व मानवी आरोग्याबरोबर बीव्हीजी पशुधन क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहे.  बीव्हीजी औषधांनी भाकड गाई म्हशी दुभत्या होतात. त्याचबरोबर  गाईं, म्हशींचे दुध देण्याचे प्रमाण वाढते.”

बीव्हीजी खते, औषधांचा वापर करुन सातारा जिल्ह्यातील कोट्याधीश झालेल्या जालिंदर सोळसकर यांनी बीव्हीजी औषधांचा अनुभव उपस्थित शेतकऱ्यांना सदोहरण समजावून सांगितला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे शहराची भविष्यातील गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्यात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरंदर विमानतळ विकास कामांचा आढावा मुंबई, दि....

‘ओव्या आजीच्या’, ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : सुलभा रारावीकर लिखित ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ आणि...

संगीतातून ईश्वर दर्शन-पद्म विभूषण उस्ताद अमजद अली खान यांचे विचार

एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे  प्रा. डॉ. श्रीवर्धनी के. झा, खासदार ज्योथिमणी...

भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल असे रशियाला वाटत नाही:ट्रंपवर विश्वास नाही

ट्रम्प यांचा दावा- भारत रशियन तेल खरेदी करणे थांबवेल मॉस्को-रशियाने...