Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पिंपरी चिंचवड विद्यापीठाचा युवाना वेलनेस कोहेसिव्ह केअर एलएलपी समवेत सामंजस्य करार

Date:

पिंपरी, पुणे दि. (दि. ८ जून २०२४) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठातील (पीसीयु) स्कूल ऑफ सायन्सेसने शुक्रवारी युवाना वेलनेस कोहेसिव्ह केअर एलएलपी सोबत शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात केला. युवाना वेलनेस ही संस्था संस्थापक, संचालक अदिती कुलकर्णी आणि सहसंस्थापक कुणाल खनाडे यांच्या नेतृत्वाखाली विविध रुग्णालये आणि कॉर्पोरेट्सना मानसोपचार आणि सायकोमेट्रिक सेवा प्रदान करते.
यावेळी पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, स्कूल ऑफ सायन्सेसच्या विभाग प्रमुख प्रा. रुचू कुथियाला आदी उपस्थित होते.
पीसीयु स्कूल ऑफ सायन्सेस मधील वेलनेस, क्लिनिकल सायकोलॉजी आणि संबंधित प्रकल्पांमधील अग्रगण्य प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी विकास आराखडा तयार करून अंमलबजावणीसाठी हा करार उपयुक्त ठरेल असे मत विभाग प्रमुख प्रा. रुचू कुथियाला यांनी व्यक्त केले. हे विशेष अभ्यासक्रम हेल्थकेअर उद्योगाच्या विकसित होत असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण अनुभव आणि करिअरच्या संधी प्रदान करण्यासाठी काळजीपूर्वक तयार केले जातील या करारासाठी प्रा. सन्निध्या मिसाळ यानी पुढाकार घेतला.
युवाना वेलनेस कोहेसिव्ह केअर एलएलपी सोबतच्या शैक्षणिक करारामुळे उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील दरी कमी होऊन वर्गातील शिकवण्यापासून अनुभवात्मक शिक्षणाकडे जाण्यास मदत करेल आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळेल असे डॉ. मणीमाला पुरी यांनी सांगितले.
युवाना तज्ञांबरोबर सह-शिक्षण, प्रशिक्षण तसेच संयुक्त प्रकल्प राबवले जातील डॉ. सुदीप थेपाडे यांनी सांगितले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामंजस्य करार करण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सामान्य व गरीब व्यक्तींच्या सुखान्ताचा ग्राफ वाढवावा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

श्री सरस्वती कराड हॉस्पिटलचे उद्घाटन‘केअर’, ‘क्युअर’ व ‘हील’ तत्वांशी...

दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील आप च्या पुनरागमनाची चाहूल

पुणे- दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील आप...

रसिकांची दाद कलाकारांना सुखावते : पं. सुहास व्यास

पंचामृत संगीत कला प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ कलाकारांचा गौरव डॉ. श्याम गुंडावार,...

डॉ. दीपक हरके यांना अमेरिका, बोस्टन येथील ग्लोबल युनिव्हर्सिटीची ॲानररी डॅाक्टरेट

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते सन्मानित पिंपरी, पुणे...