16 जागा जिंकणारे चंद्राबाबू नायडू आणि 12 जागा जिंकणारे नितीशकुमार किंगमेकर 

Date:

भाजपमध्ये सत्तास्थापनेवर विचारमंथन सुुरू झाले आहे. 543 जागांच्या लोकसभेत 33 जागा कमी पडल्या आहेत. दरम्यान, 16 जागा जिंकणारे चंद्राबाबू नायडू आणि 12 जागा जिंकणारे नितीशकुमार किंगमेकर ठरले आहेत. या मित्रपक्षांच्या साथीने भाजप सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करणार आहे. मोदी मंगळवारी रात्री ८ वाजता भाजप मुख्यालयात पोहोचले. तिथे त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मोदी यांनी खासकरुन ओडिशाचा उल्लेख केला. तिथे भाजपने बिजदचा धुव्वा उडवून 21 पैकी 20 जागा जिंकल्या आहेत. इकडे,एक्झिट पोलचे दावे फोल ठरवून उत्तर प्रदेश,महाराष्ट्र व राजस्थान सारख्या राज्यातील निकालांनी चकीत केले. राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसने विपरित परिस्थितीत निवडणूक लढवली. त्यांनी पुन्हा अदानी-अंबानीवर हल्ला चढवला. दरम्यान, सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस चंद्राबाबू नायडू,नीतिश कुमार यांच्याशी संपर्कात असल्याचे सांगितले जाते. इकडे, नायडू म्हणाले, आंध्रच्या जनतेने आमच्या युतीवर विश्वास दर्शवून विजयाची माळ गळ्यात टाकली आहे. आम्ही एनडीएसोबत आहोत. तर जदयू नेते के.सी.त्यागी म्हणाले की, निवडणूकपूर्व काळात एनडीएला दिलेला शब्द आम्ही पाळणार आहोत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हातभट्टीची दारू कायमस्वरूपी हद्दपार होणे गरजेचे – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

अनुसूचित जाती उपवर्गीकरण 2027 च्या जनगणनेच्या आधारे झाले पाहिजे पुणे...

किमान १० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही

१ जून पासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची...

लोकमाता अहिल्यादेवींचा वारसा कृतीतून जपणे हीच खरी आदरांजली : आमदार सत्यजीत तांबे

चाळीसगावमध्ये अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भव्य बाईक रॅली; पुतळ्यास...