शहरातील नाल्यांची तातडीने सफाई करून आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवावी – दीपक मानकर

Date:

पुणे-पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिष्टमंडळाने शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन पुणे शहरातील नाल्यांची तातडीने सफाई करून आपत्कालीन व्यवस्था सज्ज करणेबाबत निवेदन दिले.
जून महिन्याच्या अखेरीस पुण्यामध्ये मान्सून दाखल होत आहे. दरवर्षी होणाऱ्या पावसामुळे पुणे शहरातील अनेक भागामध्ये पाणी साचणे, पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडून छोटे मोठे अपघात होतात. तसेच साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरून डेंगू,मलेरिया, हिवताप यांसारखे गंभीर आजार होतात. पावसाळा सुरु होण्यापूर्वी पुणे शहरातील नाले, पावसाळी गटारे यांची साफसफाई करणे, गाळ काढणे ही कामे तातडीने होणे अत्यावश्यक आहे.
पावसामुळे शहरात पडणाऱ्या खड्ड्याची पाहणी करून त्या खड्ड्याची तातडीने डागडुजी करणे याकरिता पुणे महानगरपालिकेमार्फत यंत्रणा उभी करावी जेणेकरून खड्ड्यामुळे होणारे अपघातांचे प्रमाण कमी होईल.
तसेच पावसामुळे धोकादायक झाडे पडून निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि विजेच्या तारा तुटल्याने शॉर्टसर्किट सारख्या घटना यांवरती नियंत्रण आणण्यासाठी आपत्कालीन व्यवस्था तयार करावी. पुणे शहरातील यांसारख्या समस्या लक्षात घेऊन पुणेकरांना होणारा नाहक त्रास दूर करावा, असे सदर निवेदनात नमूद केले आहे.
सदर निवेदन देताना आमदार चेतन तुपे, माजी नगरसेवक सुभाष जगताप, सदानंद शेट्टी, अभिषेक बोके, शुभम माताळे, पूजा झोळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची लंडनमध्ये उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांच्याशी भेट

यूके अभ्यासदौऱ्यात महत्त्वपूर्ण चर्चा मुंबई, दि. १७ फेब्रुवारी २०२६ :...

कविता हाच माझा कर्मयोग : प्रभा सोनवणे

कै. तिलोत्तमा निफाडकर स्मृती कर्मयोगिनी पुरस्काराने प्रभा सोनवणे यांचा गौरव पुणे :...

चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात यावा

आ सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल...

टीओडी वीजमीटरमुळे पुणेकरांना मिळाली साडेआठ कोटींची सवलत

पुणे, दि. १७ फेब्रुवारी २०२६- टीओडी वीजमीटर बसविणाऱ्या वीज ग्राहकांना...