Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

राजस्थानमध्ये सिमेंट केंद्र सुरू करण्यासाठी करणार 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक 

Date:

उत्तर भारतातील बाजारपेठेत JSW सिमेंटचा प्रवेश झाला आहे

इक्विटी आणि दीर्घकालीन कर्ज याचे नियोजन करत गुंतवणूक करायची आहे

मुंबई – 21 मे 2024: 24.25 अब्ज अमेरिकन डॉलर्सची उलाढाल असलेल्या JSW समूहाचा भाग असलेल्या JSW सिमेंटने राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात ग्रीनफिल्ड, एकात्मिक सिमेंट उत्पादन सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी सुमारे 3,000 कोटींची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. सिमेंट कारखान्याचे  भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. JSW सिमेंटच्या या नवीन सिमेंट सुविधा केंद्रात 3.30 MTPA पर्यंतचे क्लिंकरायझेशन युनिट, 2.50 MTPA पर्यंतचे ग्राइंडिंग युनिट, तसेच 18 मेगावॅटच्या वेस्ट हीट रिकव्हरी बेस्ड पॉवर प्लांटचा समावेश आहे. तसेच खाणीतून चुनखडी प्रकल्पापर्यंत नेण्यासाठी 7 किमी लांबीचा ओव्हरलँड बेल्ट कन्व्हेयर आणि भट्टीत पर्यायी इंधन वापरण्याची व्यवस्था याची देखील व्यवस्था करून त्यासाठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. या प्रस्तावित गुंतवणुकीला इक्विटी तसेच दीर्घकालीन कर्जाच्या समन्वयातून निधी दिला जाईल.

JSW सिमेंटने यासंदर्भातील काही नियामक आणि वैधानिक मंजुरी आधीच मिळवल्या आहेत. तसेच इतर आवश्यक मंजुरी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे युनिट एकदा कार्यान्वित झाल्यानंतर JSW सिमेंट उत्तर भारतातील आकर्षक सिमेंट बाजारपेठेत प्रवेश करेल. सध्याच्या गुंतवणुकीमुळे 1 हजारांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे

JSW सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक श्री. पार्थ जिंदाल म्हणाले की, “आमच्या सिमेंट व्यवसायाद्वारे राजस्थानमध्ये करत असलेली ही आमची सर्वात महत्त्वाची गुंतवणूक आहेया भागात रोजगाराच्या भरीव संधी निर्माण करून राज्याच्या आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी मी राजस्थान राज्य सरकारसोबत सहयोग  करण्यास उत्सुक आहेनागौरमध्ये एकात्मिक सिमेंट सुविधा निर्माण करण्यासाठीच्या या प्रस्तावित गुंतवणुकीमुळे JSW सिमेंट पुढील काही वर्षांत संपूर्ण भारतात आपला ठसा उमटवेलया प्रदेशातील हे नवीन केंद्र आम्हाला उत्तरेकडील राजस्थानहरियाणापंजाब आणि NCR प्रदेशातील आमच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम करेल.

JSW सिमेंटचे CEO श्री. नीलेश नार्वेकर म्हणाले, या गुंतवणुकीमुळे आम्ही उत्तर भारतातील झपाट्याने वाढणाऱ्या आणि आकर्षक सिमेंट मार्केटमध्ये प्रवेश करणार आहोतया राज्यातील जीडीपी वाढीचा दर सर्वाधिक आहे तसेच येथे मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण विकासही झालेला दिसतोया तेजीत असलेल्या बांधकामासाठी पोषक बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी आम्ही खूप उत्साहित आहोत तसेच आमच्या ग्राहकांना उच्च दर्जाचे सिमेंट आणि जागतिक दर्जाची ग्राहक सेवा देण्याचे आमचे ध्येय आहे.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बारामतीची PDCC बँक रात्री 11 पर्यंत उघडी:माळेगाव कारखान्याच्या मतदारयाद्या आढळल्या, अजित पवारांचे PA, भरणेंचे सहकारी उपस्थित

पुणे-माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे बारामतीचे राजकारण चांगलेच तापले...

ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

२४ ते २६ जून रंगणार बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिन सोहळा पुणे...

कम ऑन किल मी.. आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे म्हणाले …. मरे हुए क्या मारना,मतदारांनीच तुमचा मुदडा पाडला

मुंबई: विधानसभा निवडणुकीतील कामगिरीची आकडेवारी सांगत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे...