पुसद–केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आज पुन्हा भाषण करताना भोवळ आली. त्यांचा तोल जाणारच होता तोच त्यांना त्यांच्या अंगरक्षकांनी सावरले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. ही धक्कादायक घटना यवतमाळमधील पुसद या ठिकाणी प्रचार सभेदरम्यान घडली. तर गडकरी यांची प्रकृती आता स्थिर आहे. मागील काही महिन्यांपासून त्यांना भोवळ येण्याच्या घटना घडल्या आहेत.
महायुतीच्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांची सभा पार पडत होती. त्यावेळी अचानक गडकरी यांना पुन्हा भोवळ आली. त्यांनी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा तोल जाताच त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांना सावरले. यावेळी स्टेजवरील भाजप पदाधिकाऱ्यांनी देखील धाव केली. त्यांना त्वरीत खाली बसवण्यात आले. गडकरींची डॉक्टर टीम त्या ठिकाणी हजर होतीच. त्यांनी तपासून प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांनी दिली.महायुतीने कडून 400 पारचा नारा दिल्याने प्रचारासाठी कंबर कसली आहे. आज महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी यवतमाळमध्ये दाखल झाले. उष्णतेची लाटही पाहायला मिळत आहे. याचा तब्येतीवर परिणाम होऊन गडकरींना सभेदरम्यान भोवळ आल्याचं सांगितलं जात आहे.
महायुतीची सभा सुरु असताना नितीन गडकरी सभेला संबोधित करत होते, यावेळी त्यांना भोवळ आली होती. नितीन गडकरी यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. काही क्षणांच्या विश्रांतीनंतर नितीन गडकरी यांनी पुन्हा भाषण देखील केले.