काकाच्या पाठीत सुरा कुणी खुपसला,चुलत बहिण नको होती मग ओवाळायला का जाता? जितेंद्र आव्हाड यांचे अजितदादांना प्रत्युत्तर

Date:

मुंबई- काकाच्या पाठीत सुरा कुणी खुपसला. राजकीय जन्म काकांनीच दिला. तुम्हाला चुलत बहिण नको होती मग ओवाळायला का जाता? जे ऐश्वर्य मिळाले ते कुणामुळे? भगीरथ बियाणीने आत्महत्या का केली, त्याच्या पोरीला कुणी छळले, त्यामुळे भगीरथ बियाणीने आत्महत्या केली?, असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला प्रत्युत्तर दिले आहे.दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, मी आजपर्यंत कुणाचे नाव तोंडात काढले नाही तुम्ही माझे नाव काढाल तर मी शांत बसणार नाही. बीडमध्ये मुंडे नावाच्या तरुणाला मारहाण झाली ती कुणी केली? आजही गुन्हा दाखल झाला नाही. कोण चोरडिया मला माहिती नाही. अंगाशी आल्यावर हे बालिश राजकारण करतायेत. शत्रू मोठा असला तरी काही गुप्तता बाळगायच्या असतात. आपल्या फायद्यासाठी नंतर गोष्टी काढायच्या नसतात.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 1999 साली पक्ष स्थापन झाला, याची स्थापना कोणी केली, महाराष्ट्रातील लहान पोरं देखील याचे उत्तर सांगतील शरद पवार यांनी केला. घड्याळ देशभरात कुणी नेलं, ओडिसा, अरुणाचल प्रदेश, आसाममध्ये आमदार होते ते कुणामुळे होते.शरदचंद्र सिन्हा यांच्यासारखा काँग्रेसमधील वरिष्ठ नेता शरद पवारांसोबत उभा राहिला होता. केरळमध्ये पक्षाचे लोकप्रतिनिधी होते, या पक्षाला राष्ट्रीय नेतृत्त्व कुणामुळे मिळाले होते. तुम्हाला 5 जुलैच्या सभेत शरद पवारांचा फोटो कशासाठी वापरावा वाटला. कालपर्यंत तुम्ही शरद पवार आमचे दैवत आहेत, असे म्हणायचा आणि आज शरद पवारांवर एवढ्या गोळ्या घालण्याचे कारण काय? आणि कुणी गोळ्या झाडाव्यात, असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांना विचारला आहे.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी जे काही करतो माझ्या हिंमतीवर आणि ताकदीवर करतो. काहीही खोटे सांगू नका. तुमच्या प्रत्येक आरोपाचे पुरावे मी देऊ शकतो. कोणत्या फ्लाईटने कुठे गेला, रात्रीच्या अंधारातच दिल्लीला कसे जायचे असते हे सांगेन. शरद पवारांभोवतीच महाराष्ट्राचे राजकारण फिरत आहे. त्यामुळे त्यांची भाषणे पवारांवर आहे. शरद पवारांच्या नावाला स्पर्श केल्याशिवाय राजकीय उन्नती नाही हे सगळ्यांना माहिती असल्याने हे सर्व सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जनकल्याण समितीतर्फे दादा लाड आणि महंत भारतभूषणदासजी महाराज यांना ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान

पुणे,: "समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तनाचे अनेक यशस्वी प्रयोग वैयक्तिक...

हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात मराठा ठोक मोर्चा आक्रमक:तोंडाला काळे फासणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस जाहीर

सोलापूर -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी केलेल्या वादग्रस्त...

इंग्रजांविरोधात लढणारे टिपू सुलतान देशद्रोही होते का?:दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळता? आसिफ शेख यांचा सवाल

मालेगाव -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल:शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपची तक्रार

पुणे-काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी...