पीसीसीओई मध्ये राज्यस्तरीय पारितोषिक वितरण संपन्न
पुणे (दि. २७ नोव्हेंबर २०२३) महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स (माटीपीओ) तर्फे दरवर्षी महाराष्ट्रातील अभियांत्रिकी, डिप्लोमा, मॅनेजमेंट, फार्मसी, एमसीए, आर्ट, कॉमर्स, सायन्सच्या विद्यार्थ्यांकरीता माटीपीओ ॲप्टीट्यूड आयडॉल व माटीपीओ प्रोग्रामिंग आयडॉल राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची ॲप्टीट्यूड स्किल व प्रोग्रामिंग स्किल वाढावी आणि त्यांच्यामध्ये रोजगार क्षमता वाढावी यासाठी या द्विस्तरीय स्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पी सीईटीच्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग पुणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे योगेश मोरे (वरीष्ठ उपाध्यक्ष, मेडीयाओशन), बळीराम मुटगेकर (उपाध्यक्ष, बीएनवाय मेलन), योगेश खताळे (सहाय्यक महाव्यवस्थापक, प्राज इंडस्ट्रीज), समीर महिंद्रे (संचालक, जेटाटेक इन्फोसर्व्हीसेस) व एन. एन. वडोदे (उपसंचालक, बोट) व संयोजक आणि माटीपीओचे अध्यक्ष डॉ. शीतलकुमार रवंदळे, सचिव डॉ. संजय जाधव, कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत लोखंडे व माटीपीओ चे सर्व सदस्य उपस्थित होते.
“माटीपीओ प्रोग्रामिंग आयडॉल-२०२३” च्या पहिल्या स्तरात महाराष्ट्रातील ४०० महाविद्यालयातील सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यातून दुसर्या स्तराकरीता प्रत्येक विभागातून टॉप ५० अशा एकूण १५९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आणि त्यातून प्रत्येक विभागातील पहील्या ५ विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. त्याचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे आहे.
“माटीपीओ प्रोग्रामिंग आयडॉल-२०२३” ही स्पर्धा खालील तीन विभागात घेण्यात आली.
प्रथम विभाग : यूजी,पीजी – अंतिम वर्ष. या विभागातून आदित्य बर्वे (एमआयटी अकॅडमी ऑफ इंजीनियरिंग पुणे); ऋषिकेश नायकवडी (पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे); कार्तिककुमार महिंद्रकर (राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई); मिहीर साळुंखे (अथर्व कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मुंबई) व संदीप चव्हाण (पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे) या विजेत्यांचा समावेश आहे.
द्वितीय विभाग : युजी, पीजी अंतिम पूर्व वर्ष. या विभागातून सौमिल तिवारी (गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च अवसरी); धीरज पाटील (पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च रावेत); सौम्या तिवारी (गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च अवसरी); देवांश ठक्कर (लोकमान्य टिळक कॉलेज ऑफ इंजीनियरिंग नवी मुंबई) व अनुज वाघुल्डे (पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च रावेत) या विजेत्यांचा समावेश आहे.
तृतीय विभाग : युजी – प्रथम व द्वितीय वर्ष आणि डिप्लोमा – प्रथम, द्वितीय व अंतिम वर्ष. शुभम झा (पिल्लई कॉलेज ऑफ इंजीनियरिंग नवी मुंबई); अथर्व मैंद (एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी पुणे); आदित्य सूर्यवंशी (सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे); पवन कारके (एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे) व केयुर दोशी (वीरमाता जिजाबाई टेकनॉलॉजिकल इन्स्टिट्यूट मुंबई) या विजेत्यांचा समावेश आहे.
“माटीपीओ ॲप्टीट्यूड आयडॉल-२०२३” च्या पहिल्या स्तरात महाराष्ट्रातील सुमारे ५०० महाविद्यालयातील सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातून दुसर्या स्तराकरीता टॉप १२१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आणि त्यातून पहील्या ५ विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.
“माटीपीओ ॲप्टीट्यूड आयडॉल-२०२३” स्पर्धेत अजिंक्य म्हसवाडे (पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे); दर्पण सतीजा (बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वर्धा); वरद बोराडे (पीईएस मॉडर्न कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे); आर्यन राऊत (अथर्व कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मुंबई); पुष्पक मैंद (वाटुमल इन्स्टिट्यूट मुंबई) व ईशान मट्टू (नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी पुणे) या विजेत्यांचा समावेश आहे.
पारितोषिकांमध्ये प्रथम बक्षीस लॅपटॉप, द्वितीय बक्षीस स्मार्टफोन, तृतीय बक्षीस टॅब, चतुर्थ बक्षीस स्मार्ट वॉच व पाचवे बक्षीस बॅकपॅक चा समावेश होता.
या स्पर्धांकरिता पीएचएन टेक्नॉलॉजी, ई बेक लँग्वेज लॅबोरेटरी, ग्लोबल ड्रीम्झ, गिक्स फॉर गिक्स, कोल्हापूर फाउंड्री व इंजीनियरिंग क्लस्टर, इम्पेरियल ओव्हरसीज एज्युकेशन, आय स्कूल कनेक्ट, इशरे पुणे चॅप्टर व एऑन कोक्युब्स यांचे सहकार्य मिळाले होते.