पुणे-शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे काम या राक्षसी वृत्ती असलेल्या भाजपच्या सरकारने केले आहे, असा हल्लाबोल शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. ते हडपसर येथे ‘मविआ’च्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते..या बैठकीला काँग्रेस नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार श्री. महादेव बाबर, प्रशांत जगताप, अरविंद शिंदे, संजय मोरे, दिलीप तुपे, प्रविण तुपे, राजेंद्र बाबर यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. आगामी निवडणुका आपल्याला एकजुटीने लढायच्या आहेत. देशातील, राज्यातील सत्ताधाऱ्यांचे शेतकरी विरोधी धोरण, वाढती महागाई, बेरोजगारी, लोकशाहीला असलेले आव्हान या बाबी आपल्याला प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. यासाठी महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्षांमध्ये समन्वय असला पाहिजे.आपला हेतू शुद्ध असेल तर संपूर्ण नियती ही आपल्याला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत असते. आपला हेतू शुद्ध आहे म्हणून आपला विजयही निश्चित आहे हा विश्वास मनात ठेवूया… हातात “हात” घेऊन, संघर्षाची “मशाल” पेटवूया व लवकरच विजयाची “तुतारी” वाजवूया… असे आवाहन उपस्थितांना केले
हाथाला असेल काम तर मंदिरातच कशाला ? हृदयातही वसेल राम
खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरण्याचे काम हे भाजप सरकार करत आहे. राम मंदिराची उभारणी केली ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण आम्ही एक दिवस रामाच्या दर्शनासाठी जातो. पण उरलेल्या 364 दिवस आम्हाला महागाई, बेरोजगारी, अंदाधुंदी, सांप्रदायिक वातावरणाला सामोरे जावं लागतं. त्यामुळे प्रामाणिक प्रयत्न करून निवडणुकांध्ये आपल्याला काम करण्याची गरज आहे.
ही लढाई स्वाभीमानाची
अमोल कोल्हे म्हणाले की, येणारी निवडणूक ही काय फक्त शरदचंद्र पवार साहेबांसाठी नाही तर महाराष्ट्राच्या स्वाभीमानाची लढाई असणार आहे. येणाऱ्या काळात प्रत्येकाल मानाचे पानं मिळेल. पण त्यासाठी आधी लग्न कोंढाण्याचे त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीत तुम्ही सर्व लोक ताकदीने काम कराल, अशी अपेक्षा व खाशी देखील आहे.
‘मविआ’ कोणतीही फूट पडणार नाही
महाविकास आघाडीवर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, मी मोठ्या विश्वासाने सांगतो की, महाविकास आघाडीमध्ये कोणतीही फूट पडणार नाही, याची खात्री मला आहे. आपण सर्वच लोक सामान्य कुटुंबातील लोक आहोत. माझ्यासारख्या शेतकऱ्यांच्या मुलाला शरद पवार साहेबांनी संधी दिली. तशीच संधी प्रत्येकाला मिळेल. प्रामाणिकपणे काम करा, हडपसर मतदार संघात विजय आपलाच होईल, असा विश्वास देखील कोल्हे यांनी व्यक्त केला.