“आम्ही अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचे दूरदर्शी अंतरिम अर्थसंकल्प २०२४ सादर केल्याबद्दल अभिनंदन करतो. त्यांनी सर्वसमावेशक विकासाचा टप्पा निश्चित केला आहे. विशेषत: पंतप्रधान आवास योजना ग्रामीण याद्वारे पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण यावर लक्ष केंद्रित करून पुढील ५ वर्षात ३ कोटी घरे आणि आणखी २ कोटींचे नियोजन हे फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या शाश्वत समाजासाठीच्या बांधिलकीशी सुसंगत आहे. पीएम किसान सन्मान योजना आणि पीएम फसल विमा योजना यांसारखे शेतकरी-केंद्रित उपक्रम आपल्या ‘अन्न दाता’ प्रती सरकारची बांधिलकी दर्शवतात. फिनोलेक्स इंडस्ट्रीजला या उपक्रमांचे सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे. २०४७ पर्यंत समृद्ध आणि सक्षम भारतावरील आमचा विश्वास दृढ करून या परिवर्तनात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास आम्ही उत्सुक आहोत,”
असे फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अजित वेंकटरमण म्हणाले.