पुणे – भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ज्ञानेश्वर कटके आणि सुरेंद्रदादा पठारे फाउंडेशन आयोजित वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ग्रीको-रोमन प्रकारात महाराष्ट्राच्या प्रवीण पाटील, विश्वजित मोरे आणि धनश्री फंड यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून सुवर्णपदक मिळवले.
कै.विठोबा मारुती पठारे क्रीडा संकुल खराडी येथे ही स्पर्धा झाली. ग्रिकोरोमनमध्ये पुरुषांमध्ये १० वजनीगट व महिला विभागात २ वजनीगटाच्या कुस्त्या पार पडल्या. ग्रिकोरोमनमध्ये ६३ किलो गटाच्या अंतिम लढतीत प्रवीण पाटील याने दिल्लीच्या उमेशवर ८-० अशी मात करून सुवर्णपदक पटकावले. यानंतर ५५ किलो गटाच्या अंतिम फेरीत विश्वजित मोरे याने कर्नाटकाच्या अर्जुनवर मात करून सुवर्णपदक पटकावले. महिला विभागात भाग्यश्री फंडने ५५ किलो गटात सुवर्णयश मिळवले. महाराष्ट्राच्या स्वरूप चौगुलेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. प्रवीण डोंगळे, अमृत रेडकर यांनी ब्राँझपदकाची कमाई केली.
ग्रिकोरोमन विभागाची दिल्लीने २०० गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. महाराष्ट्र १२२ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर ११९ गुणांसह चंदीगडने तिसरा क्रमांक मिळवला.
ग्रिकोरोमनचा निकाल
५५ किलो
प्रथम – विश्वजित मोरे – महाराष्ट्र
व्दितीय – अर्जुन – कर्नाटक
तृतीय – मनिष – हरियाणा
तृतीय – संजीव – दिल्ली
६० किलो
प्रथम – सुमीत – चंडीगड
व्दितीय – अजितकुमार – मध्य प्रदेश
तृतीय – चेतन – दिल्ली
तृतीय – प्रवीण डोंगाळे – महाराष्ट्र
६३ किलो
प्रथम – प्रवीण पाटील – महाराष्ट्र
व्दितीय – उमेश – दिल्ली
तृतीय – सनी कुमार – हरियाणा
तृतीय – अश्विन कुमार – उत्तर प्रदेश
६७ किलो
प्रथम – दीपक – दिल्ली
व्दितीय – केवल बेनीवाल – हिमाचल प्रदेश
तृतीय – अमृत रेडकर – महाराष्ट्र
तृतीय – राहुल – चंडीगड
७२ किलो
प्रथम – अजय डागर – हरियाणा
व्दितीय – स्वरूप चौगुले – महाराष्ट्र
तृतीय – जगमाल सिंह – राजस्थान
तृतीय – सागर – दिल्ली
७७ किलो
प्रथम – रवी कुमार – दिल्ली
व्दितीय – औरंगजेब खान – मध्य प्रदेश
तृतीय – परमानंद बासव- कर्नाटक
तृतीय – अजय – उत्तर प्रदेश
८२ किलो
प्रथम – नीरज – दिल्ली
व्दितीय – भुपेंदर – राजस्थान
तृतीय – भागवत सिंह – उत्तर प्रदेश
तृतीय – अंकित बोरा – चंडीगड
८७ किलो
प्रथम – तेजपाल – राजस्थान
व्दितीय – कपील – दील्ली
तृतीय – आदित्य – कर्नाटक
तृतीय – अजय – हरियाणा
९७ किलो
प्रथम – सोनू – हरियाणा
व्दितीय – नितिन कुमार – चंडीगड
तृतीय – वीरेंद्र – दिल्ली
तृतीय – अनुज कुमार – मध्य प्रदेश
१३० किलो
प्रथम – सोनू – दिल्ली
व्दितीय – साहील – चंडीगड
तृतीय – अनुराग – हरियाणा
तृतीय – मुद्दसीर- मध्य प्रदेश