श्री गोवर्धन पीठाचे शंकराचार्य श्री निश्चलानन्द सरस्वती स्वामी महाराज दि.३१ पासून तीन दिवस पुण्यातः

Date:

पुणे, दि.३० जानेवारी: जगन्नाथपुरी येथील श्री गोवर्धन पीठाचे प.पू. जगदगुरू शंकराचार्य श्री निश्चलानन्द सरस्वती स्वामी महाराज यांच्या पवित्र दर्शनाचा लाभ पुणेकरांना होणार आहे. महाराजांचे आगमन बुधवार, दि.३१ जानेवारी रोजी सकाळी ९.०० वा. होणार आहे. याच दिवशी दुपारी १२.३० वा. महाप्रसाद व सायं. ५.३० वा. संगोष्ठी व महाप्रसादाचे वाटप होईल. गुरुवार, दि. १ फेब्रुवारी रोजी लॉ कॉलेज रोड येथील शांतीशीला क्रीडा संकुल येथे त्यांच्या वेदयुक्त दर्शन, विज्ञान व व्यवहार या विषयावर धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्व पुणेकरांसाठी असून महाराजांच्या पवित्र दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक अ‍ॅड. सीमा तिवारी यांनी केले. श्री गोवर्धन पीठाच्या आदित्य-आनंद वाहिनीतर्फे  कार्यक्रम होणार आहे.
शुक्रवार, दि.२ फेब्रुवारी रोजी स. ११.३० वा. संगोष्ठी, दीक्षा व महाप्रसाद दिला जाईल. त्यानंतर जगद्गुरू शंकराचार्य हे मुंबईला रवाना होतील. दरम्यान तीन दिवस त्यांचा मुक्काम सौ. अवंतिका  व श्री. अशिम अशोक पाटील यांच्या शांता रेसिडेन्सी येथे होणार आहे.
शांतिशीला सोसायटीचे डॉ. नरेंद्र वैद्य, हेमंत येरवडेकर, वासंती पुरोहित यांच्यासह विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची पूर्वतयारी केली आहे. येथे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील मान्यवर ऊत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. अशी माहिती संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंत गाडगीळ यांनी दिली.
प.पू. स्वामी निश्चलानन्द सरस्वती स्वामी महाराज १४५ वे शंकराचार्य
पुरुषोत्तम क्षेत्र पुरी येथे गोवर्धन पीठाची स्थापना इ. स. ४८६ वर्षांपूर्वी झाली. आचार्य पद्मपाद गोवर्धन पीठाचे सर्वप्रथम शंकराचार्य यांच्या रुपाने अभिषिक्त झाले. गोवर्धन पीठाच्या शंकराचार्य परंपरेतील प.पू. स्वामी निश्चलानन्द सरस्वती स्वामी महाराज हे १४५ वे शंकराचार्य म्हणून कार्यरत आहेत. स्वामी निश्चलानन्द सरस्वती स्वामी महाराज प्रसिद्ध गणितज्ञ व विद्वान आहेत. त्यांनी या विषयावर दोनशेहून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांची सर्व पुस्तके स्व. भारती कृष्ण तीर्थजी महाराज यांना समर्पित आहेत. वैज्ञानिक, दार्शनिक आणि व्यवहारिक या तीनही निकषांवर जे योग्य पद्धतीने सिद्ध होईल तेच अनुकरणीय आहे, असे श्री जगद्गुरू शंकराचार्य स्वामी निश्चलानन्द सरस्वती स्वामी महाराज सांगतात ते देशाच्या कानाकोपर्‍यात वेद व राष्ट्रीय एकात्मता इत्यादींचा उपदेश करतात.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची लंडनमध्ये उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांच्याशी भेट

यूके अभ्यासदौऱ्यात महत्त्वपूर्ण चर्चा मुंबई, दि. १७ फेब्रुवारी २०२६ :...

कविता हाच माझा कर्मयोग : प्रभा सोनवणे

कै. तिलोत्तमा निफाडकर स्मृती कर्मयोगिनी पुरस्काराने प्रभा सोनवणे यांचा गौरव पुणे :...

चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात यावा

आ सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल...

टीओडी वीजमीटरमुळे पुणेकरांना मिळाली साडेआठ कोटींची सवलत

पुणे, दि. १७ फेब्रुवारी २०२६- टीओडी वीजमीटर बसविणाऱ्या वीज ग्राहकांना...