पीपीआर रोग निर्मूलनासाठी राज्यात लसीकरण फेरी-३ सुरू

Date:

पुणे, दि. २ मार्च २०२६ : शेळ्या-मेंढ्यांमधील गंभीर व संसर्गजन्य विषाणूजन्य रोग असलेल्या पीपीआर च्या प्रतिबंधासाठी राज्यात ०१ मार्च २०२६ ते १३ एप्रिल २०२६ या कालावधीत प्रतिबंधात्मक लसीकरण फेरी-३ राबविण्यात येणार आहे.

केंद्र पुरस्कृत पशुस्वास्थ्य व रोगनियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत १०० टक्के केंद्र पुरस्कृत गंभीर पशुरोग नियंत्रण योजनेतून राज्यातील ९० लाख ६८ हजार शेळ्या व २८ लाख ३५ हजार मेंढ्या अशा एकूण १ कोटी १९ लाख ३ हजार पशुधनाचे लसीकरण करण्यात येणार आहे.

सन २०३० पर्यंत देशातून पीपीआर रोगाचे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट असून, ४ महिन्यांवरील सर्व शेळ्या-मेंढ्यांना दरवर्षी लसीकरण करण्यात येणार आहे. ही मोहीम ४५ दिवसांत पूर्ण करण्यासाठी शीतसाखळी व्यवस्था, गावनिहाय सूक्ष्म नियोजन, जनजागृती व अतिरिक्त मनुष्यबळाची तयारी करण्यात आली आहे.

डॉ. रामास्वामी एन, सचिव पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यविकास विभाग तसेच डॉ. प्रवीणकुमार देवरे, आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र शासन यांनी सर्व मेंढपाळ व शेळीपालकांनी आपल्या पशुधनाचे पीपीआर प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाण्याची नासाडी केल्यास दंडात्मक कारवाई,तिसऱ्यांदा उल्लंघन केल्यास गुन्हा

वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव, बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याच्या वापरावर निर्बंध स्थायी...

स्वच्छता कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! दीवा प्रतिष्ठान आणि हर्षवर्धन मानकर यांच्याकडून दिवाळी सरंजामाचे वाटप

नऊ वर्षांपासून सामाजिक उपक्रमात सातत्य; महापालिकेच्या कायमस्वरूपी व कंत्राटी...

‘सह्याद्री’ गुजरातच्या उद्योगपतीला विकण्याचे पाप महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही: हर्षवर्धन सपकाळ

टोरंट प्रकल्पाच्या बचावाचे सरकारचे सर्व दावे खोटे, हजारो रोजगार...