बोपोडीत ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय व्हावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

Date:

‘ससून’ ची विश्वासार्हता जपणे गरजेचे -पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रुग्णांची वैद्यकीय गरज भागवणाऱ्या ‘ससून सर्वोपचार रुग्णालयाची विश्वासार्हता आणि सेवाभावी प्रतिमा जपली जावी, याकरीता सरकारने आणि प्रशासनाने जागरूक रहावे, अशी अपेक्षा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज, गुरुवारी विधानसभेत बोलताना व्यक्त केली.अलीकडेच पॉस्को अंतर्गत गंभीर गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी ससून रुग्णालयातून पळून गेला. या संदर्भातील लक्षवेधी सूचनेवर आमदार शिरोळे यांनी मत व्यक्त केले.ससून सर्वोपचार रुग्णालय केवळ एक हॉस्पिटल नसून पुणे, सातारा, सांगली आणि आसपासच्या अनेक जिल्ह्यांतील रुग्णांसाठी आशेचा किरण आहे. कित्येक दशकांपासून रुग्णालयात सर्वसामान्य जनतेला मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवत आहे.अलीकडच्या काही घटनांमुळे ससूनच्या प्रतिमेला धक्का पोहोचत आहे. ही बाब अत्यंत संवेदनशील आहे. ज्याप्रमाणे मुंबईतील जे.जे.हॉस्पिटलमधील घटनांचा परिणाम शहराच्या प्रतिमेवर होतो, तसाच परिणाम ससून मधील घडामोडींचा पुण्यावरही होऊ शकतो, असे आमदार शिरोळे यांनी सभागृहात सांगितले. ‘ससून’ची गौरवशाली परंपरा आणि सेवाभावी वृत्ती टिकवून ठेवणे आवश्यक आहे. प्रशासकीय निवडी करताना अधिक पारदर्शकता आणि संवेदनशीलतेची गरज आहे, असे मत आमदार शिरोळे यांनी व्यक्त केले.

पुणे : जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर बोपोडी येथे ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय मंजूर व्हावे , अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (गुरुवारी ) विधान सभेत केली.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर नाशिक फाटा ते संचेती हॉस्पिटल या पट्ट्यात एकही मोठे शासकीय रुग्णालय नाही.​या मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक जास्त असल्याने अपघातांचे प्रमाण मोठे असते. तसेच महामार्गावर कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, बोपोडी आणि खडकी अशा मोठ्या परिसराचा समावेश आहे. येथील ​अपघातातील रुग्णाला ससून किंवा वायसीएम रुग्णालयात नेताना ‘गोल्डन अवर’ निघून जातो.​तरी सरकारकडे मागणी आहे की, खडकी-बोपोडी दरम्यान किमान ३०० बेडचे सुसज्ज शासकीय रुग्णालय तातडीने मंजूर करावे, जेणेकरून ससून आणि औंध रुग्णालयावरील ताण ही कमी होईल , असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.शासकीय रुग्णालयात मानसिक तणाव ( स्ट्रेस ) निवारण केंद्र सुरु करावे, अशीही मागणी आमदार शिरोळे यांनी केली.

सध्या हृदयविकार, मेंदूच्या आजारांचे प्रमाण मानसिक ताण तणावाने वाढले आहे याकडे आ. शिरोळे यांनी वेधले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेचा लोहगावच्या 7 RMC प्लांटवर जोरदार हथोडा

पत्रकार परिषद घेऊन पुणे आरएमसी असोसिएशनने दिला होता इशारा...

ड्रग्जचा काळाधंदा, खरात प्रकरण, नाशिक व अमरावतीतील महिलांच्या लैंगिक शोषणाचा घटना हे अपयश फडणविसांचे…

मुंबई, दि. १५ एप्रिल २०२६ महाराष्ट्रातील तरुणपिढीला बरबाद करणारे ड्रग्जचे...

“महिला सुरक्षेसाठी यंत्रणा अधिक मजबूत करण्याचे उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांचे निर्देश”

सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करण्यासाठी मानक कार्यपद्धती तयार...