पुणे- गजबजलेल्या सातारा रस्त्यावर आदिनाथ सोसायटी समोर गांजा विक्री करायला आलेल्या दोघांना पकडून पुणे पोलिसांनी ७,३६,९२० रू किचा ३६ किलो ८९६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. हर्षल दिलीप बोरा, वय ३१ वर्षे, रा. फ्लॅट नं. ११,बी विंग, अरिहंत सोसायटी, सॅलेसबरी पार्क, स्वारगेट, पुणे रविंद्र हनुमंत दुर्गुले, वय-३५ वर्षे, रा. मु.पो.नांदगिरी, ता.कोरेगाव जि. सातारा अशी या दोघांची नावे आहेत . या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे .
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’पोलीस आयुक्त, रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, (अति. कार्यभार), अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता कोंम्बींग ऑपरेशन, अंमली पदार्थ तस्करी करणारे गुन्हेगार यांची माहिती काढुन कडक कारवाई करण्याच्या सुचना व आदेश दिले आहेत.
वरिष्ठांनी दिलेले आदेश व सुचनानुसार सहा.पो.आयुक्त, गुन्हे-१, सुनील तांबे यांनी अंमली पदार्थ विरोधी पथक-०१ कडील पोलीस निरीक्षक, राजेंद्र लांडगे यांना आदेश व सुचना दिल्या होत्या. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक-१ कडील अधिकारी व स्टाफ यांनी दि.२५ जानेवारी २०२४ रोजी स्वारगेट पो स्टे चे हद्दीत स्टाफसह पेट्रॉलिंग करीत असताना पोलीस अंमलदार, मनोजकुमार साळुंके व पोलीस अंमलदार, मारुती पारधी यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पुणे सातारा रोड, आदिनाथ सोसायटीचे पार्किंग ग्राउंड समोरील सार्वजनिक रोडवर दोन इसम हे गांजा विक्री करीता येणार असल्याची माहिती मिळाल्याने त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक, राजेंद्र गलांडे यांनी त्याबाबत वरिष्ठांना कळविले असता, वरिष्ठांनी त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे व स्टाफ यांनी पुणे स.नं.६९५/१, पुणे सातारा रोड, आदिनाथ सोसायटीचे
पार्किंग ग्राउंड समोरील सार्वजनिक रोडवर सापळा रचुन इसम नामे १) हर्षल दिलीप बोरा, वय ३१ वर्षे, रा. फ्लॅट नं. ११,बी विंग, अरिहंत सोसायटी, सॅलेसबरी पार्क, स्वारगेट, पुणे २) रविंद्र हनुमंत दुर्गुले, वय-३५ वर्षे, रा. मु.पो.नांदगिरी, ता.कोरेगाव जि. सातारा यांना ताब्यात घेवुन त्यांची झडती घेतली असता, त्यांचे ताब्यात एकुण १३,०४,९२०/- रू किचा ऐवज त्यामध्ये ७,३७,९२०/- किचा ३६ किलो ८९६ गांजा हा अंमली पदार्थ, १०,०००/- किचा एक ग्रे रंगाचा रेडमी नोट कंपनीचा मोबाईल, १०,०००/- किचा एक निळ्या रंगाचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, २०,०००/- किचा एक काळया रंगाचा रियलमी कंपनीचा मोबाईल,१५,०००/- किचा एक नेव्ही ब्ल्यु रंगाचा सॅमसंग कंपनीचा ए-२१५, मोबाईल, १०,०००/- रू किचा एक निळ्या रंगाचा नोकिया कंपनीचा मोबाईल, किं. रु.२,०००/- चा एक ब्ल्यु रंगाचा मायक्रो मॅक्स कंपनीचा कि पॅड असलेला मोबाईल, ५,००,०००/- किची एक सिल्व्हर रंगाची रेनोल्ट कंपनीची किगर कार तीचा आर.टी.ओ. क्रमांक एम.एच.१४/जे.यु./१५३८ असा असलेला ऐवज व गांजा हा अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आले असल्याने तसेच सदरचा गांजा हा त्यांचे साथीदार शशिकांत गोविंद वाडकर, रा, वारजे माळवाडी, पुणे व नितीन ऊर्फ आण्णा महादेव दिक्षीत, रा. वडगाव मावळ यांना विक्री करणार असल्याने नमूद आरोपी यांचे विरूध्द स्वारगेट पो स्टे गुरनं. ३३/२०२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही पोलीस आयुक्त, रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, (अति. कार्यभार), अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा.पो.आयुक्त, गुन्हे-१, श्री. सुनिल तांबे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १, गुन्हे शाखा, पुणे शहरकडील पोलीस निरीक्षक, राजेंद्र लांडगे, पोलीस अंमलदार, विशाल शिंदे, योगेश मोहिते, सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, पांडुरंग पवार, ज्ञानेश्वर घोरपडे, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, संदिप शिर्के, संदेश काकडे, नितेश जाधव, सचिन माळवे, रेहाना शेख, यांनी केली आहे.