व्हीआयपींच्या बंदोबस्तासाठी स्वतंत्र पोलिसांची नेमणूक करावी  

Date:

सुनील माने यांचे मुख्यमंत्र्याना पत्र

पुणे : पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी, वाढलेल्या वाहतूक समस्या या पार्श्वभूमीवर पोलिसांना गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ तसेच वेळ उपलब्ध होत नाही. त्याचप्रमाणे व्हीआयपींच्या स्वागतासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त यांसारख्या लोकसेवकांचा कामाचा वेळ जात आहे. त्यामुळे व्हीआयपींच्या बंदोबस्तासाठी स्वतंत्र पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ते सुनील माने यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भातले पत्र त्यांनी ई मेलद्वारे पाठवले आहे.

सुनील माने यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पुणे शहरात दिवसेंदिवस वाढणारी वाहने आणि उपलब्ध असणारे रस्ते यांच्या व्यस्त प्रमाणामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहेत. त्याचप्रमाणे शहरात खून, मारामारी, चोरी, सायबर गुन्हे वाढत आहेत. शहरातील वाढती गुन्हेगारी हा ही एक चिंतेचा विषय आहे. मुंबई पाठोपाठ पुणे ही राज्यातील महत्वाचे शहर बनत चालले असल्यामुळे व्हीआयपी दौऱ्यात सातत्याने वाढ होत आहे. गत वर्षीचा विचार करता गेल्या वर्षी झेड प्लस सुरक्षा असणाऱ्या ३३४ व्यक्तिंना, झेड सुरक्षा असणाऱ्या ९८ जणांना, वाय प्लस दर्जाच्या ९६९ जणांना तर वाय सुरक्षा असणाऱ्या २५ लोकांना पोलिसांना सुरक्षा पुरवावी लागली. व्हीआयपी दर्जाच्या व्यक्तींच्या बंदोबस्ता सोबत ‘कॅन्व्हॉय’ साठी सुद्धा गाड्या पुरवाव्या लागतात. पोलिस प्रशासनाकडे गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने पोलिसांवर ताण येत आहे. गुन्हेगारीला अटकाव करण्यासाठी पोलीस यंत्रणेवरील ताण कमी करून बंदोबस्त आणि या गोष्टींसाठी नेहमीच्या पोलीस दलाचा वापर न करता त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची पुणे शहराला गरज आहे.

व्हीआयपी बंदोबस्त व स्वागतासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त यांचा सतत वेळ जातो. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या कामाचा वेळ वाया जातो. लोकसेवकांचा हा वाया जाणारा हा वेळ टाळण्यासाठी पुणे शहराच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्त नेमावा, तसेच व्हीआयपी बंदोबस्तासाठी स्वतंत्र पोलिस व्यवस्था करावी अशी मागणी मी सरकारकडे  सातत्याने करत आहे. याबाबत पुण्याचे पालकमंत्री आजितदादा असताना त्यांना ११ डिसेंबर २०२३ साली व्हीआयपी बंदोबस्तासाठी स्वतंत्र पोलिस नेमावेत व पुण्यासाठी स्वतंत्र वाहतूक आयुक्त नेमावा यासाठी १३ डिसेंबर २०२३, २५ डिसेंबर २०२४ रोजी पत्र दिले होते. आपल्यालाही पुण्यासाठी स्वतंत्र वाहतूक पोलिस आयुक्त नेमावा यासाठी ६ मार्च आणि १३ ऑगस्ट २०२५ रोजी पत्र दिले होते. तरी कृपया आपण याबाबत लक्ष घालून व्हीआयपी बंदोबस्तासाठी स्वतंत्र पोलिस नेमावेत तसेच पुण्यासाठी स्वतंत्र वाहतूक पोलिस आयुक्त ही नेमावा अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.  

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

युद्ध थांबले,इराण-अमेरिका 2 आठवड्यांसाठी युद्धविराम

इराण आणि अमेरिका 2 आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमत झाले आहेत....

बेकायदा केबलमुळे निवृत्त ACP चा टिळक रोडवर अपघात -वर्षानंतर महापालिकेच्या विरोधात आरोपपत्र दाखल

पुणे- एकीकडे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पुणेकरांच्या...

अमली पदार्थांविरोधात जनचळवळ उभारणे लोकप्रतिनिधींची जबाबदारी : सभागृह नेते गणेश बिडकर

पुणे महानगरपालिका आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ...

विमाननगर मधील हुक्का पार्लरवर छापा

पुणे- विमाननगर मधील हुक्का पार्लरवर छापा मारून पुणे पोलिसांनी...