राष्ट्रीय नैसर्गिक शेती फेडरेशनची पंढरपूर येथे स्थापना

Date:

पुण्यातील सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, राष्ट्रीय कर्तव्य अभियान समूहाचा पुढाकार
पुणे : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या प्रभावामुळे भारतातील ३० टक्के जमिनी नापिक झाल्या आहेत, देशात दरवर्षी पंधरा लाख पेक्षा अधिक नागरिकांना कॅन्सर सारखा गंभीर आजार होत आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, ग्रामीण रोजगार निर्मितीसाठी अथवा  पर्यावरण संतुलनासाठी नैसर्गिक शेतीची लोकचळवळ उभारणी करणे काळजी गरज आहे. यासाठी संत गजानन महाराज प्रगट दिनाचे निमित्त साधून, पुण्यातील सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, राष्ट्रीय कर्तव्य अभियान समूहाच्या माध्यमातून, सदगुरु दुंडा महाराज (देगलूरकर) मठ पंढरपूर येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती फेडरेशन ची स्थापना करण्यात आली.

या वेळी कृषी भूषण तात्या मगर, राष्ट्रीय कर्तव्य अभियानाचे मुख्य विजय वरुडकर, संघ जिल्हा कार्यवाह प्रताप टपले, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाचे संचालक आचार्य ज्ञानेश्वर शिंदे, खुशालचंद मोरे, सुरेश घाडगे,  पांडुरंग बरळ, दत्तात्रय हरळे, गजानन मगर, नानासाहेब जाधव, हनमंत जाधव, कलप्पा भतगुणकी, उदय मुळे, विठ्ठल क्षीरसागर, अरुण जगताप, प्रताप देशमुख, शुभम अडबाल, डॉ बापु तारसे इतर शेतकरी उपस्थित होते.

सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह गेली १२ वर्षा पेक्षा अधिक काळ सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. आज पर्यंत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या राज्यातील ३०००  पेक्षा अधिक सामाजिक संस्था, १००० पेक्षा अधिक गोशाळा गोपालक, ५००० पेक्षा अधिक कीर्तनकार यांची बांधणी करण्यात आली आहे.  मागील वर्षी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ५००० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती विषयी प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले होते.

ग्रामीण स्वावलंबन विषयी काम करतांना गट शेतीतून कृषी उद्योग विकसित करणे हा हेतू ठेऊन राष्ट्रीय नैसर्गिक शेती फेडरेशन कार्यरत असणार आहे. भविष्यात उद्योगांचे दाईत्व आलेल्या सीएसआर प्रकल्पांची जोडणी ग्राम समस्या निवारणासाठी व नैसर्गिक शेती प्रकल्प गतिशील करण्यासाठी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह प्रयत्नशील असेल, असे विजय वरुडकर यांनी सांगितले.

प्रांत, जिल्हा व तालुका स्तरावर संयोजक समिती स्थापन करून गाव, गोशाळा, शेतकरी गट अथवा बचत गट यांना केंद्र करून नैसर्गिक शेती प्रकल्पांची बांधणी व प्रशिक्षण सत्र आयोजन केले जाईल असे सांगण्यात आले.

कृषी भूषण तात्या मगर यांनी सांगितले की,  रासायनिक खत बी बियाणांवर दर वर्षी दीड लाख करोड पेक्षा अधिक रुपयांचे अनुदान केंद्र सरकार देत आहे. त्या एवजी शेतकऱ्यांना देशी गोवंश पालनासाठी, नैसर्गिक शेतीसाठी आर्थिक अनुदान सरकार नी द्यावे. ज्या मुळे खऱ्या अर्थाने शेती विकास होईल.

ज्ञानेश्वर शिंदे म्हणाले की गेली एक वर्ष आम्ही या फेडरेशनच्या बांधणी व कामकाज विषयी विचार विनिमय करत आहोत. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहीम आचार्य देवव्रत हे सच्चे गोभक्त व नैसर्गिक शेती चे प्रवर्तक आहेत. आम्ही लवकरच माननीय राज्यपाल यांची भेट घेऊन नैसर्गिक शेती प्रकल्पांची पुढील वाटचाल आपणास कळवू.

राष्ट्रीय नैसर्गिक शेती फेडरेशन लोक चळवळीसोबत जुडण्यासाठी ७५८८९५४५८० या क्रमांक वर संपर्क साधावा अशी माहिती देण्यात आली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रजित नायर आज अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट), पदाचा पदभार स्वीकारला.

पुणे- आज पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) या पदाचा...

ड्रेनेज विभागातील हजारो कोटींच्या खर्चाची चौकशी करा:महापौरांकडे नैमित्तिक समिती स्थापनेची भाजपच्या माजी नगरसेवकांची मागणी

पुणे- महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागामार्फत गेल्या चार वर्षांत झालेल्या हजारो...