‘हॉटेल स्वराज्य आणि बार’वर आढळल्या ईव्हीएम मशीन

Date:

जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी संपत असतानाच मोहोळ शहराजवळील ‘हॉटेल स्वराज्य’ येथे मध्यरात्रीच्या सुमारास हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. काही लोक ईव्हीएम मशीन घेऊन हॉटेलमध्ये जात असल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांनी त्यांना रंगेहात पकडल्याचा दावा केला आहे. या प्रकारामुळे निवडणूक यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर आता गंभीर आरोप होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ शहराजवळ असलेल्या हॉटेल स्वराज्य आणि बारच्या परिसरात दोन सीलबंद ईव्हीएम मशीन आढळून आल्या. उमेश पाटील यांनी या संबंधित व्यक्तींना जाब विचारत हा प्रकार उघडकीस आणला. घटनेचे गांभीर्य ओळखून निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सीमा होळकर आणि पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

“मतदानाच्या पवित्र प्रक्रियेत अशा प्रकारे मशीन हॉटेलवर आढळणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे. पारदर्शकतेचे दावे करणाऱ्या प्रशासनाने याचे उत्तर द्यावे,” अशी मागणी उमेश पाटील यांनी केली.
प्रशासनाचे स्पष्टीकरण: त्या राखीव मशीन्स होत्या

या गदारोळानंतर मोहोळचे तहसीलदार आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी प्रशासनाची बाजू मांडली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, अडवण्यात आलेल्या मशीन्स या ‘राखीव’ स्वरूपातील होत्या. या मशीनचा प्रत्यक्ष मतदानासाठी कुठेही वापर झालेला नाही. मतदान झालेल्या सर्व ईव्हीएम मशीन रात्री १०:३० वाजेपर्यंतच सुरक्षितपणे ‘स्ट्रॉन्ग रूम’ मध्ये जमा करून रूम सील करण्यात आली आहे. या राखीव मशीन्स अद्याप सीलबंद स्वरूपातच आहेत.

प्रशासनाने या मशीन्स ‘राखीव’ असल्याचे सांगितले असले, तरी त्या हॉटेल किंवा बारच्या परिसरात का नेल्या जात होत्या? याचे समाधानकारक उत्तर अद्याप मिळालेले नाही. मतमोजणीला अवघे काही तास उरले असताना या घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सरासरी ६५.९० टक्के मतदान झाले असून, मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का सुमारे १ टक्क्याने घसरला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ७०.५५% मतदान सांगोला तालुक्यात झाले. तर सर्वात कमी ५८.३९% मतदान दक्षिण सोलापूरमध्ये झाले. या निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात रंगणार सहावा सुपरहिट ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’!

(शरद लोणकर) मराठी चित्रपटसृष्टीतील वैविध्यपूर्ण कथा, नव्या विचारांची मांडणी आणि...

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेवरून केंद्र सरकारवर काँग्रेसचा निशाणा

सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीचे काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांच्याकडून स्वागत पुणे...

… मोदी, खुर्ची खाली करा’

पेट्रोल, डिझेलचे दर कमी करा-स्वाती शिंदे, अध्यक्ष पुणे शहर...

SIR अभियानासाठी काँग्रेस सरचिटणीस अभिजीत सपकाळ यांची राज्य समन्वयकपदी नियुक्ती.

मुंबई, दि. १५ मे २०२६ निवडणूक आयोगाने राज्यात जाहीर केलेल्या...