एकीकडे शरद पवार सक्रीय तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांचा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्यास होकार

Date:

पुणे-एकीकडे शरद पवार यांनी नीरा नदीच्या प्रदूषणाची माहिती घेऊन राजकीय सक्रियतेचे संकेत मिळत असतानाच दुसरीकडे सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास होकार दिला असल्याचे वृत्त आले आहे . तसेच उद्याच सायंकाळी 5 वाजता शपथविधी देखील पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्षाची शनिवारी सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक होणार असून या बैठकीत उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे बोलले जात आहे.

उद्याच्या बैठकीत सगळ्यांचे एकमत झाले तर उद्याच शपथविधी होऊ शकतो, असे सूचक विधान छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना केले होते. त्यामुळे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, तर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री ठरतील. तसेच नरेश आरोरा हे सुनेत्रा पवारांचा निरोप घेऊन मुंबईकडे रवाना झाल्याचे देखील समोर आले आहे. राजकीय गोष्टींची चर्चा करण्यासाठी सुनेत्रा पवारांनी नरेश आरोरा यांना बारामती येथे बोलावले असल्याची माहिती आहे. त्यानुसार नरेश आरोरा आणि सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा झाल्यानंतर त्यांचा निरोप घेऊन आरोरा मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, लोकांची जी मागणी आहे ती रास्त आहे. सुनेत्रा ताईंकडे पक्ष प्रमुख पद देण्यात यावे. अनेक लोकांची अशी मागणी आहे आणि त्यात काही चूक आहे, असे मला वाटत नाही. पण शेवटी याबाबत जो काही निर्णय होणार आहे तो सीएलपीमध्ये होईल. भुजबळ यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेविषयी विचारले असता, त्यांनी याबाबत मला फारसे काही माहित नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यासंदर्भात बोलताना म्हणाले, आज मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली हे खरे आहे. सुनेत्रा वहिनी आणि कुटुंब धार्मिक विधीमध्ये आहेत. धार्मिक विधी झाल्यानंतर आम्ही सर्व चर्चा करणार आहोत. आणि त्यानंतर आम्ही ठरवू. जे काही जनतेच्या मनात आहे, कार्यकर्त्यांच्या मनात आहे त्यानुसार निर्णय घेऊ. आज आपण पाहत आहोत की संपूर्ण राज्य शोकात आहे. दादांचे सर्व पैलू संबंध महाराष्ट्राने अनुभवले आहेत. त्यातच आम्ही आहोत, असे तटकरे यांनी म्हटले आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची उद्या 11 वाजता महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पक्षाध्यक्ष पदावर कोण असणार यावर देखील निर्णय घेतला जाणार आहे. सुनेत्रा पवारच पक्षाच्या अध्यक्षा असाव्यात, अशी लोकांची भावना आहे. त्यानुसारच पक्ष निर्णय घेईल, असे बोलले जात आहे. दरम्यान, पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचे देखील पक्षाध्यक्ष पदासाठी नाव चर्चेत असल्याचे समजते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आईच्या मायेची तुलना जगात कशाशीही होऊ शकत नाही

मराठी विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष राजा दीक्षित यांचे मत मातृगौरव...

” झिरो पेंडेंसी “च्या नावाखाली अयोग्य कारभार ?

अवघ्या सात तासात 95 विषय मंजूर... विक्रमी कारभार पुणे- काल...

५०० चौ. फुटाच्या घराला मिळकत कर माफीचे आश्वासन ठरले भाजपची बनवा बनवी,फसवा अर्थसंकल्प – चंदूशेठ कदम यांची टिका

पुणे-निवडणूक लढविताना भाजपने पुणेकरांना मुंबईप्रमाणे ५०० चौरस फुटाच्या घराला...

महिलांच्या नावावरील मिळकतींना ५० टक्के कर सवलत हा निर्णय महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देणारा

स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या...