गोखलेनगर वाकडेवाडी भागातील वसाहतीतील जनतेला चांगल्या सुविधा मिळवून देणार: आम आदमी पार्टी

Date:

पुणे:गोखलेनगर, वाकडेवाडी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वसाहती असून त्यामध्ये ड्रेनेज लाईन,पाणी लाईन, रस्ते अशा अनेक सुविधा अपुऱ्या आहेत. या भागात एकीकडे टोलिजंग बिल्डिंग्स आणि दुसरीकडे झोपडपट्टी अशी स्थिती आहे. येथील डॉ भाभा हॉस्पिटल अजून सुरू झाले नाही, शिवाजीनगर बस स्थानक, विद्यापीठ उड्डाणपूल ही कामे रखडलेली आहेत. सरकारी शाळा चांगल्या नाहीत,वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे. या समस्यांवर उत्तर काढू असे आप च्या उमेदवार शितल जौंजाळ यांनी प्रचारादरम्यान सांगितले.

प्रभात क्रमांक सात गोखले नगर वाकडेवाडी या शिवाजीनगर भागातील मतदार क्षेत्रात आम आदमी पार्टी तर्फे शंकर थोरात शैलेंद्र मेमाणे आणि शितल जौंजाळ हे उमेदवार उभे आहेत. या भागात वस्त्यांमधील दिवाबत्ती, ड्रेनेज लाईन, मुलांना कोचिंग याबाबत या उमेदवारांनी पाटील इस्टेट,नतावाडी, मुळारोड,इंदिरा वसाहत, खैरेवाडी, जनवाडी या भागात चांगले काम केलेले आहे. मूळचा काँग्रेसचा समजला जाणाऱ्या या प्रभागातील पूर्वीच्या उमेदवारांनी पक्षांतर केलेले आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या भागात मतदारांच्या घरोघरी भेटी ची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. भोसलेनगर भागात भाजप माजी नगरसेवकांचे फारसे काम नाही आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी पक्षांतर केले असल्याने परंपरागत काँग्रेसचे व सुशिक्षित मतदार यावेळेस आम आदमी पार्टीचा झाडू चालवतील असा विश्वास आपचे मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी पर्यायी मार्गांचाही विचार करावा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक अध्यासनाचे प्रमुख डॉ....

PMPMLची ‘वर्षा सहल’ विशेष पर्यटन बस सेवा सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

मुळशी धरण, पळसे धबधबा आणि नयनरम्य सेल्फी पॉईंटचा प्रवास;...

सनी देओल म्हणाले- ‘भारत माझी आई तर पाकिस्तान मावशी आहे’:चित्रपट ‘बंटवारा 1947’ च्या प्रमोशनदरम्यान विधान

चित्रपट 'बंटवारा 1947' च्या प्रदर्शनापूर्वी सनी देओल एका वक्तव्यामुळे...

आधार मूकबधिर विद्यालयातील १०३ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

पुणे, दि.४ "ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत"या उद्देशाने भारतीय संस्कृती...