“तुमच्या समस्या सोडविण्यासाठी तुमच्या दारी” : बाप्पु मानकर ‘फिरते समस्या निवारण कार्यालय’ सुरू करणार

Date:

पुणे : आजवर २४ तास जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांची कामे मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पुढील काळात ज्येष्ठ नागरिकांच्या तातडीच्या सेवेसाठी ‘फिरते समस्या निवारण कार्यालय’ थेट त्यांच्या दारी जाऊन समस्या सोडवेल, अशी घोषणा राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी केली. प्रभाग क्रमांक २५ मधील प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी हा शब्द दिला.

प्रभाग २५ – शनिवार पेठ व महात्मा फुले मंडई परिसरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांना कोणतीही तातडीची समस्या उद्भवल्यास घरपोच सेवा देण्यासाठी ‘फिरते समस्या निवारण कार्यालय’ सुरू करण्यात येणार आहे. हेल्पलाईन क्रमांकाद्वारे ड्रेनेज, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आदी समस्यांची माहिती कार्यालयाला दिल्यास, संबंधित परिसरात तातडीने भेट देऊन समस्या सोडविण्याचे काम सुरू केले जाईल. समस्या निराकरणास वेळ लागणार असल्यास, प्रत्येक टप्प्यावर नागरिकांना माहिती दिली जाणार आहे. माझ्या २४ तास जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सेवेचा हा पुढचा टप्पा असेल. नागरिक आम्हाला ‘सेवक’ म्हणून निवडून देणार आहेत, आणि त्याच भावनेतून त्यांची निस्वार्थ सेवा करण्याचा माझा पक्का निर्धार आहे, असे राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सांगितले. ते सध्या घरोघरी नागरिकांशी संवादावर भर देत आहेत. २४ तास जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून हजारो लोकांच्या समस्या सुटल्या आहेत, या नागरिकांचा पाठिंबा मिळत असल्याचे बाप्पु मानकर म्हणाले.

दरम्यान, बाप्पु मानकर यांच्यासह स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित हे भाजपाचे अधिकृत उमेदवार घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता जागेवर निपटारा

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष उपक्रम; ७५ टक्के...

बाजीराव पेशवे यांच्या पालखेड विजय स्मारकासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे सहकार्य

स्मारकासाठी सर्वतोपरी मदतीची ग्वाही; अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास प्रमुख...

भाजपचा महानगरपालिकेतील कारभार लोकशाही कडून हुकूमशाहीकडे-दीप्ती चवधरी

            पुणे-भाजपचा महानगरपालिकेतील कारभार लोकशाही कडून हुकूमशाहीकडे जाणारा असल्याची टीका...