डेअरीच्या जागेवर डल्ला…! पुण्यात आणखी एक १५०० कोटींचा गैरव्यवहार….

Date:

डेअरीच्या जागेवर डल्ला…! पुण्यात आणखी एक १५०० कोटींचा गैरव्यवहार, बोपोडी जमीन प्रकरणात एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा….

पुणे : कोरेगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहार प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. यादरम्यान पुण्यातील बोपोडी येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी जमीन बळकावल्याचा आणखी एक प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये पुणे शहराचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे निलंबन करण्यात आहे. येवले यांच्यावर शासकीय जमिनींचा अपहार केल्याचा ठपका ठेवत राज्य सरकारने त्यांना निलंबित केले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेत या घोटाळ्यासंबंधी सविस्तर माहिती दिली आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली ही सुमारे १ हजार ५०० कोटीची जमीन कशी नावावर करण्यात आली याबद्दल खडसे यांनी मोठे खुलासे केले आहेत.

खडसे म्हणाले की, काल पुणे येथील खडक पोलीस ठाण्यात एक एफआयआर दाखल झाला. हा एफआयआर हेमंत गावंडे, राजेंद्र विद्वांस, ऋषिकेश विद्वांस, मंगल विद्वांस तसेच विद्यानंद पुराणिक, जयश्री संजय एकबोटे, शीतल तेजवानी, दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्याविरोधात झाला. सर्वे नं. ६२, फायनल प्लॉट नं. १४ बोपोडी १४ या गट नंबरसंबंधी आहे. हा गट नंबर १५ एकरचा आहे. या सर्वांनी बनवट कागदपत्रे तयार करून त्यांनी ही जमीन आपल्या नावावर करून घेतल्याचा गुन्हा आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

२०१४ च्या सुमारास याच्यावर टीडीआर मिळावा म्हणून त्यांनी पुणे महापालिकेकडे अर्ज केला. फाइल अंतिमतः टीडीआरचा पैसा देण्याच्या संदर्भात मंजूरीपर्यंत आली, यादरम्यान २०१४ च्या काळात जेव्हा मी विरोधपक्षनेता होतो, तेव्हा हा विषय माझ्या लक्षात आणून देण्यात आला. त्यानंतर मी सरकार आणि आयुक्तांना पत्र लिहिले. ज्यामध्ये या जागेचा टीडीआर मंजूर करू नये अशी सूचना मी सरकारला केली. पण तरीही त्यावर पुढे कारवाई झाली नाही, असे एकनाथ खडसे म्हणाले.

दरम्यानच्या काळात हा टीडीआरचा प्रस्ताव माझ्याकडे प्रलंबित होती. यावर मी आदेश दिला होता की, ही जमीन आपली आहे आणि ही कोणालाही देता कामा नये. मधल्या काळात त्यांनी ही जमीन आपल्या नावावर लावण्याचा आणि टीडीआर मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी तो मिळवला. ही जमीन त्यांनी २०१५ च्या काळात मिळवली. कृषीमंत्री या नात्याने ही फाइल माझ्याकडे होती, यावर कारवाई होत नव्हती म्हणून मी कृषी महाविद्यालयाच्या डीनला सूचना केल्या की हेमंत गावंडे आणि इतरांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा. तेव्हा माझ्या सूचनेनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

१ फेब्रुवारी २०१५ रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला. आत्ता काल जो गुन्हा दाखल झाला त्यामध्ये योगायोगाने हेच आरोपी आहेत. हेमंत गावंडे हा क्रिमीनल आहे. याने अनेकांना फसवलं आहे. ही जमीन त्याला न मिळू न दिल्याने त्याने भोसरी प्रकरणात माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला. या लोकांना मी पाठीशी घातलं नाही म्हणून या सर्वांनी भोसरी प्रकरणात माझ्याविरोधात गुन्हा दाखल केला, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

ही जमीन फार पूर्वी पेशव्यांची जमीन होती, त्या काळात भट म्हणून एक कुटुंब होतं. त्या कुटुंबाला पेशव्यांनी उदर निर्वाहासाठी ही जमीन दिली होती. त्यामध्ये एक अट होती की, कुटुंबामध्ये जोपर्यंत मुलगा होत राहिल तोपर्यंत राहिल मुलगी जन्माला आली तर हा अधिकार राहाणार नाही. त्या कुटुंबात जोपर्यंत मुलगा होता तोपर्यंत हा अधिकार त्यांच्याकडे राहिला नंतर मुलगी जन्माला आल्यानंतर हा अधिकार संपला. ही जमीन सरकारजमा झाली. नंतर १८८३ पासून ही सरकारी जमीन आहे. १९२० साली ही जमीन कृषी महाविद्यालयासाठी देण्यात आली. तेव्हापासून ही कृषी विभागाकडे आहे. ही जमीन अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आहे.

शिवाजीनगर परिसरातील या जमीनीला मोठा भाव आहे. आजचा बाजारभावाप्रमाणे याची किंमत पाहिली तर पंधराशे कोटीं रूपयांच्या आसपासची ही जमीन आहे. १५०० कोटी रूपयांची ही जमीन विद्वांस कुटुंबाला हाताशी धरून हेमंत गावंडे, तेजवानी या कंपीनीने आम्ही कूळ आहोत असे कागदपत्रे तयार केले. ही जमीन कृषी महाविद्यालयाच्या अखत्यारीत असताना त्यांनी हा प्रकार २००९ पासून सुरू केला. तेव्हापासून या जमीनीचा पाठपुरावा केला जात होता, असा आरोप एकनाथ खडसे म्हणाले.

पुण्याच्या डीपी प्लॅनमध्ये ही मोकळी जमीन पुणे ट्रान्सपोर्ट विभागाला रिझर्वेशनसाठी दाखवण्यात आली, त्यामुळे ही पडून राहिली. पण तरीही ही जमीन आमची आहे असे दाखवून त्यांनी कागदपत्रे तयार करून सरकारकडे अपील केलं. हेमंत गावंडे यांनी तेथील जिल्हाधिकाऱ्यांकडे जमीन परत देण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी ते नाकारलं. त्यानंतर ते आयुक्तांकडे गेले. आयुक्तांनी देखील ही सरकारी जमीन असल्याचा निर्णय दिला. त्या निर्णयाविरोधात त्यांनी मंत्र्यांकडे अपील केलं, त्यांनीही नाकारल्यानंतर ते उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने सरकारला चार आठवड्यात निर्णय घेण्यास सांगितल्यानंतर ती फाइल सरकारकडे आली आणि परत सरकारने ती नाकारली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

घाबरू नका,जुलै महिन्यात पुण्यात कोसळतील जलधारा.. जरा धीर धरा

एल निनो (El Niño) च्या संभाव्य परिणामाच्या पार्श्वभूमीवर महापालिका...

घोष पथकाच्या वादनातून झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांना मानवंदना

पुणे, दि. 18 जून : स्वातंत्र्यलढ्यातील अद्वितीय शौर्य आणि...

पाणी साठवा, पण झाकून ठेवा; डेंग्यू-मलेरिया रोखण्यासाठी महापालिकेचे आवाहन

पुणे, दि. १८ : उन्हाळ्यात आणि ‘एक दिवसाआड पाणीपुरवठा’...

जगभरातील सैन्य दलांसाठी वैशिष्ट्यपूर्ण माउंटेड आर्टिलरी गन प्रणाली उपलब्ध करण्याचा करार

पॅरिस, फ्रान्स, १८ जून २०२६ : भारत फोर्ज लिमिटेडच्या संपूर्ण मालकीची संरक्षण क्षेत्रातील उपकंपनी असलेल्या ‘कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड’ने (केएसएसएल) लष्करी वाहनाधारित संरक्षण प्रणाली विकसित करणारी आघाडीची कंपनी एएम जनरल हिच्यासोबत युरोसॅटरी संरक्षण प्रदर्शनात आज धोरणात्मक भागीदारी करार केला. बदलत्या युद्धपरिस्थितीत जगभरातील आधुनिक सैन्य दलांच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने केएसएसएल आणि एएम जनरल यांच्यात ही धोरणात्मक भागीदारी करण्यात आली आहे. या भागीदारीद्वारे सैन्य दलांना आकाराने कॉम्पॅक्ट, हलक्या वजनाचा, टिकाऊ, कठीण परिस्थितीतही प्रभावीपणे कार्य करणारा तसेच सर्व हवामानात आणि सर्व प्रकारच्या भूभागांवर सहज वापरता येणारा अत्याधुनिक ‘माउंटेड आर्टिलरी गन प्लॅटफॉर्म’ उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे सैन्य दलांना विशेष स्पर्धात्मक लाभ मिळू शकतो. या क्षेत्रात जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. त्या दृष्टीने ही भागीदारी मित्रदेशांमधील व्यापक वितरणाला चालना देण्यासाठी करण्यात आली आहे. आधुनिक, गतिमान आणि युद्धपरिस्थितीत टिकून राहू शकणाऱ्या १५५ मिमी तोफखान्याची क्षमता विकसित करू इच्छिणाऱ्या भागीदार देशांसाठी हे व्यासपीठ विस्तारक्षम आणि निर्यातीसाठी योग्य उपाय म्हणून सादर केले जाणार आहे. या धोरणात्मक भागीदारीचा लाभ घेत ‘एएम जनरल’ने अमेरिकी लष्कराच्या ‘मोबाईल टॅक्टिकल कॅनन’ (एमटीसी) कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीही प्रस्ताव सादर केला आहे. अमेरिकी सरकारला सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावामध्ये केएसएसएलच्या माउंटेड आर्टिलरी गन प्लॅटफॉर्मच्या युद्धपरिस्थितीत उपयुक्त ठरलेल्या आणि सिद्ध झालेल्या रचनेवर आधारित १५५ मिमी एमटीसी प्रणाली विकसित करून पुरविण्याचा समावेश आहे. या प्रस्तावाची निवड झाल्यास, या प्रणालीचे वितरण २०२७मध्ये करण्याचे नियोजन आहे. विशेष विकसित करण्यात आलेल्या पॉवरपॅक आणि सस्पेन्शन प्रणालीसह कमी वजनाच्या या वाहनामुळे एमएआरजी प्रणाली लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी तसेच रणांगणावरील जलद हालचालींसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. या प्रणालीमध्ये ५२ कॅलिबर १५५ मिमी तोफ, पेटंटप्राप्त सॉफ्ट रीकॉइल टेक्नॉलॉजी (एसआरटी) आधारित रीकॉइल नियंत्रण प्रणाली, स्वयंचलित लोड-सहाय्य यंत्रणा आणि सर्व हवामानात कार्य करणारी प्रगत फायर कंट्रोल प्रणाली देण्यात आली आहे. त्यामुळे त्यातून अप्रत्यक्ष तसेच प्रत्यक्ष मारा करणे शक्य होते. ही प्रणाली प्रमाणित उच्च-स्फोटक प्रक्षेपास्त्र ४० किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत डागू शकते. तसेच या वाहनामध्ये २० हून अधिक प्रक्षेपास्त्रे आणि प्रोपेलंट चार्जेस साठवता येतात. पारंपरिक तोफखाना प्रणालींच्या तुलनेत ‘एमएआरजी’मधील एसआरटी प्रणाली ही रीकॉइलमधून निर्माण होणारा अधिकचा जोर शोषून घेते. त्यामुळे वाहन आणि टॉवरचे वजन कमी ठेवणे शक्य होते. तसेच संपूर्ण शस्त्र प्रणालीवर तिच्या वापराच्या कालावधीत कमी ताण येतो. ‘केएसएसएल’ची मूळ कंपनी असलेल्या ‘भारत फोर्ज लिमिटेड’चे उपाध्यक्ष आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी म्हणाले, "आमच्या प्रगत तोफखान्याच्या क्षमतांवर एएम जनरलने विश्वास दाखवला आहे. आधुनिक युद्धाच्या गरजा पूर्ण करणारी अत्याधुनिक आणि युद्धपरिस्थितीत सिद्ध झालेली उत्पादने देण्याच्या आमच्या कटिबद्धतेतून ही भागीदारी साकार झाली आहे." ‘एएम जनरल’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन चॅडबोर्न म्हणाले, "केएसएसएल’सोबतची ही भागीदारी आमच्या मित्रदेशांना आणि रणांगणावरील सैनिकांना सहाय्य करण्याच्या आमच्या सामायिक बांधिलकीचे प्रतीक आहे. त्यांच्या अत्याधुनिक आणि सिद्ध झालेल्या प्लॅटफॉर्ममध्ये पेटंटप्राप्त ‘सॉफ्ट रीकॉइल टेक्नॉलॉजी’चा समावेश करून आम्ही खऱ्या अर्थाने नवी क्षमता उपलब्ध करून देत आहोत. रणांगणावरील बदलत्या परिस्थितीत यामुळे लष्करी दलांना महत्त्वाचा फायदा मिळू शकतो." केएसएसएल भारतात विकसित करण्यात आलेल्या आणि जागतिक दर्जाच्या निकषांशी सुसंगत संरक्षण प्रणाली तयार करते. भारतासह जगभरातील देशांना प्रगत संरक्षण क्षमता उपलब्ध करून देणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.