नवी दिल्ली–
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
नार्वेकरांनी आमदार अपात्रता प्रकरणी निकाल दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या वतीने जोरदार विरोध केला गेला. नार्वेकरांनी पक्षपातीपणे निकाल दिला असून त्यांनी दिल्लीतील स्क्रिफ्ट वाचली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. तर नार्वेकरांनी दिलेला निर्णय निर्लज्जपणाचा कळस असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केली होती. तर आम्ही न्यायालयात दाद मागू असेही ते म्हणाले होते.शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्या उद्धव ठाकरे महा पत्रकार परिषद घेणार आहेत. उद्या दुपारी 4 वाजता वरळी डोम याठिकाणी एका मोठ्या सभागृहात ही पत्रकार परिषद पार पडेल. यामध्ये उद्धव ठाकरे काही महत्त्वाचे खुलासे विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयानंतर करतील अशी माहिती देण्यात आलीये. उद्धव ठाकरेंसोबत या पत्रकार परिषदेत कायदे तज्ञ सुद्धा बोलवण्यात आलेत.