● पहिल्या दिवशी धनुर्विद्या, फुटबॉल आणि स्केटिंगमध्ये खेळाडंची स्पर्धा
● श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये धनुर्धरांनी, तर विमान नगर येथील स्केटिंग रिंगवर कुशल स्केटर्सच्या कामगिरीने जोशपूर्ण प्रारंभ
पुणे, २१ नोव्हेंबर – एसएफए चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या आवृत्तीने पुणे शहरात नवा जोश संचारला असून सगळीकडे खेळाचा जोश पाहायला मिळत आहे. स्पोर्ट्स फॉर ऑल (एसएफए) या भारतातील आघाडीच्या तंत्रज्ञानावर आधारित, मल्टी- स्पोर्ट्स शालेय स्पर्धा प्लॅटफॉर्मने आयोजित केलेल्या थरारक क्रीडा हंगामाच्या पहिल्या दिवशी उदयोन्मुख खेळाडू आणि उत्साही चाहत्यांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. पुण्यातील ‘क्रीडा क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाची शाळा’ हा सन्मान मिळवण्यासाठी खऱ्या अर्थाने स्पर्धा सुरू झाली आहे.
श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पहिल्या दिवसाची सुरुवात १० आणि १९ वर्षाखालील मुलांच्या तसेच १० व १४ वर्षाखालील मुलींच्या धनुर्विद्या स्पर्धेने झाली. भारतीय धनुर्विद्येचे कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज असलेल्या तरुण धनुर्धारांच्या सळसळत्या उत्साहाने संपूर्ण मैदानात एक वेगळीच उर्जा जाणवत होती. १० वर्षाखालील मुलांच्या अंतिम भारतीय फेरीत जीजी इंटरनॅशनल स्कूल पिंपरी, पिंपरी चिंचवड शाळेच्या श्लोक कानेरे या विद्यार्थ्याने सुवर्ण मिळवले. वॉलनट शाळेच्या अबीर समीर पाटीलने रौप्य मिळवले, तर जेएसपीएमच्या ब्लॉसम पब्लिक स्कूल, ताथवडे शाळेच्या सम्यन संदीप पाटीलने ब्राँझ मिळवले.
धनुर्विद्या स्पर्धेमध्ये १० वर्षाखालील वयोगटातील राष्ट्रीय खेळाडू अनुषा शेगावीच्या आई म्हणाल्या, ‘मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाशिवाय इतर उपक्रमांमध्ये गुंतवणे फार आवश्यक असते आणि त्यातून खेळाची गोडी लागली. नोकरदार आई आणि डेंटिस्ट या नात्याने पाल्यांनी शाळेनंतर काहीतरी अर्थपूर्ण करणे मला गरजेचे वाटत होते. माझ्या दोन्ही मुलींनी धनुर्विद्येची निवड केली. माझी मोठी मुलगी अन्विता शेगावीने एआयसीएसई नॅशनल्समध्ये पाचवा क्रमांक, राज्य स्तरावर १२ वा क्रमांक मिळवला आणि आता ती एसएफए चॅम्पियनशीपमध्ये कंपाउंड खेळणार आहे. मजा म्हणून सुरू केलेला खेळ आता त्यांची पॅशन बनला आहे. प्रशिक्षक नितीन अंबोरे यांचे उत्तम मार्गदर्शन त्यांना मिळाले. आज माझी धाकटी मुलगी अनुषा भारतीय धनुर्विद्या स्पर्धेत भाग घेत आहे.’
थरारक धनुर्विद्या स्पर्धेनंतर श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा वॉर्म- ट्रॅक १० आणि १२ वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल लीग सामन्यांचा एरिना बनला. एकूण १६० उत्साही मुलांनी १० वर्षाखालील स्पर्धेत भाग घेतला, तर १६८ मुलांनी १२ वर्षाखालील स्पर्धेत आपले कौशल्य दाखवले.
त्यानंतर विमान नगर स्केटिंग रिंगवर स्पर्धेची उत्सुकता सुरू झाली. १५ व १७ वर्षाखालील मुले आणि ७ व १७ वर्षाखालील मुलींसह असंख्य स्केटर्सच्या कौशल्याने वातावरण जिवंत झाले. स्केटर्सच्या कलेसाठी विमान नगर स्केटिंग रिंग कॅनव्हास बनले. त्यांची प्रत्येक गिरकी या कार्यक्रमाची रंगत वाढवणारे होती.
या आठवड्यात एसएफए चॅम्पियनशीपमध्ये फुटबॉल, बॅडमिंटन, बुद्धीबळ, टेनिस, बास्केटबॉल, कबड्डी, थ्रोबॉल, कराटे आणि इतर विविध स्पर्धांचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे.
आता चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या दिवशी सज्ज व्हा, कारण या दिवशी १४, १६ आणि १८ वर्षाखालील विभागांमध्ये फुटबॉलची स्पर्धा होणार आहे. दैनंदिन वेळापत्रक, पुण्याच्या दुसऱ्या एसएफए चॅम्पियनशीपमधील प्रत्येक क्रीडा स्पर्धेचा तपशीलवार निकाल आमच्या www.sfaplay.com अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. रियल टाइम अपडेट्स, हायलाइट्स आणि एक्सक्लुसिव्ह बिहाइंड द सीन्स क्षणांसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरील आमची सोशल मीडिया चॅनेल्स फॉलो करा.
एसएफए चॅम्पियनशीप देशातील तरुण खेळाडूंमध्ये खेळाची आवड तयार करण्यासाठी बांधील असून उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन उद्याचे कुशल खेळाडू घडवण्याचे ध्येय आहे.
क्रीडा आणि क्रीडाप्रकार | मेडल | खेळाडू | शाळा |
फुटबॉल (१० वर्षाखालील मुले) | सुवर्ण | श्लोक कानिरे | जीजी इंटरनॅशनल स्कूल, पिंपरी, पिंपरी चिंचवड |
रौप्य | अबीर समीर पाटील | वॉलनट स्कूल, फुरसुंगी | |
ब्राँझ | सम्यन संदीप पाटील | जेएसपीएम ब्लॉसम पब्लिक स्कूल, ताथवडे | |
फुटबॉल (१२ वर्षाखालील मुले) | सुवर्ण | अनुषा गिरीश शेगावी | माउंट सेंट पॅट्रिक अकॅडमी |
रौप्य | श्राव्या हरगुडे | सेंट. अर्नोल्ड्स सेंट्रल स्कूल, वडगाव शेरी | |
ब्राँझ | मन्वा मिलिंद देसाई | पोदार इंटरनॅशनल स्कूल, वाघोली | |
धनुर्विद्या (१० वर्षाखालील मुली) | सुवर्ण | संस्कार समीर खुले | एयर फोर्स स्कूल, चंदन नगर |
रौप्य | अरूष नाईक | महेश विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल, कोथरूड | |
ब्राँझ | परिमल प्रवीण देशपांडे | जीजी इंटरनॅशनल स्कूल, पिंपरी, पिंपरी चिंचवड | |
धनुर्विद्या (१० वर्षाखालील मुली) | सुवर्ण | गौरी अगरवाल | कल्प वृक्ष अकॅडमी |
रौप्य | आर्या विजयकुमार बामणे | जीजी इंटरनॅशनल स्कूल, पिंपरी, पिंपरी चिंचवड | |
ब्राँझ | स्वानंदी सोमनाथ गावंडे | बेकन हाय स्कूल, भोसरी | |
धनुर्विद्या (१४ वर्षाखालील मुले) | सुवर्ण | वेदांत पवार | पायोनियर पब्लिक स्कूल हडपसर |
रौप्य | मल्हार भागवत | राजा शिव छत्रपती स्कूल दुदुलगाव | |
धनुर्विद्या (१९ वर्षाखालील मुले) | ब्राँझ | श्लोक निलेश लगदिवे | एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड |
सुवर्ण | आदित्य प्रसाद | एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड |