पुणे- कोर्टात लढावे अशा पद्धतीने कायदेशीर चालाखी करत महापालिका प्रशासनाने ७००० कामगारांच्या भावनांशी खेळ चालविला असून त्यांचे आर्थिक आणि मानसिक शोषण करण्याचा प्रकार उघडकीस आल्याचे राष्ट्रवादीचे पर्वती विभागातील नेते नितीन कदम यांनी सांगितले, त्यांनी खासदार वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कंत्राटी कामगारांच्या दिवाळी बोनसच्या विषयावर मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांची भेट घेतली तेव्हा केंजळे यांनी ‘हे आमचे कामगारच नाहीत; अशी भूमिका घेतल्याने दिवाळी बोनस आणि कामगारांच्या हक्कांना तिलांजली देण्याचा प्रकार उघड झाल्याचे स्पष्ट झाले.
ठेकेदारी पद्धतीने कामगारांची पिळवणूक कशी केली जाते हे महापालिकेने देखील आपल्या वर्तनातून देखील सिद्ध करून महापालिका अशा कायदेशीर पळवाटा काढून चलाखीने कामगारांच्या भावनांशी खेळ खेळत आहेत .पुणे महापालिकेत 7000 कंत्राटी कामगार आहेत. बोनस, सानुग्रह अनुदान इत्यादी विषयासाठी दिवाळी पूर्व हे सर्व विविध राजकीय आधाराखाली आणि नेत्यांच्या आधाराखाली उपोषणाला बसले होते. अशा बोलघेवड्या फसव्या स्वार्थी आणि प्रसिद्धी लोलुप नेत्यांची नाटकी मर्जी राखण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी राजकीय पुढार्यांनाही लाजवतील असे एकापेक्षा एक आश्वासन दिली. वृत्तपत्रांमध्ये कामगारांची दिवाळी गोड होणार अशा बातम्या झळकल्या. परंतु हि केवळ फसवी प्रसिद्धी ठरली प्रत्यक्षात कामगारांच्या पदरी निराशाच पडली..कोणताही बोनस त्यांना मिळाला नाही.बिचाऱ्या कामगारांसह त्यांच्या कुटुंबियांना खोटी आशा दाखवून त्यांची फसवणूकच केली गेली.त्यांच्या भावनांशी क्रूर खेळ खेळला गेला.

पुणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांची एवढी फसवणूक कधीच झाली नव्हती.. हेच ते नितीन केंजळे मुख्य कामगार अधिकारी आणि सोबत दिवाळीच्या वेळेस त्यांनी काढलेले कार्यालयीन पत्रक असे नितीन कदम म्हणाले.खासदार वंदना चव्हाण यांच्या सूचनेनुसार मी या संदर्भात मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांची भेट घेऊन जाब विचारला.. या महाशयांनी तर “हे आमचे कामगाराच नाही”अशी भूमिका घेत हात वर केले..अतिरिक्त आयुक्त व आयुक्त उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही.खासदार वंदनाताई चव्हाण सदर कंत्राटी कामगारांचा प्रश्नासाठी लवकरच आयुक्तांची भेट घेणार आहेत. असेही कदम यांनी सांगितले आहे.


