Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पश्चिम बंगालमधील हिंदूंवरील अत्याचारा विरोधात विहिंपचे जन आक्रोश आंदोलन 

Date:

विश्व हिंदू परिषद बजरंग दल कसबा जिल्हा यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
पुणे : ‘पश्चिम बंगाल की गलीया सुनी है, ममता सरकार खुनी है’.. ‘हिंदू वरील अत्याचार थांबलाच पाहिजे’..  अशा घोषणा देत पश्चिम बंगाल येथे हिंदूंवर होत असलेल्या होत अत्याचाराचा जाहीर निषेध करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. पश्चिम बंगाल मध्ये लवकरात लवकर राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात महामहिम राष्ट्रपती यांच्या नावाने देण्यात आले.

विश्व हिंदू परिषद बजरंग दल कसबा जिल्हा यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलन केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण, लालजी महाराज, बजरंग दल संयोजक नितीन महाजन, विभाग मंत्री धनंजय गायकवाड, केतन घोडके, विभाग सहमंत्री संतोष अनगोळकर, जिल्हा मंत्री विजय कांबळे, बजरंग दल संयोजक विक्रम घुंगुरवाले, मातृ शक्ती संयोजिका सरिता अंबिके यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

किशोर चव्हाण म्हणाले, पश्चिम बंगाल मध्ये होणारे हिंसक आंदोलन थांबवण्यात ममता बॅनर्जी सरकार यांना अपयश आले आहे. त्यांचा मूक पाठिंबा या आंदोलनाला आहे. हिंदू लोकांचा काही संबंध नसताना त्यांना लक्ष्य करण्यात आले, दुकाने जाळली, गाड्या जाळल्या महिलांवर अत्याचार करण्यात आले. हे हिंसक आंदोलन  पश्चिम बंगालमधील वेगवेगळ्या भागात पसरले. हिंदू धर्म, हिंदू समाज आणि पोलिस प्रशासनाला लक्ष्य करण्यात आले आहे.   त्यामुळे पश्चिम बंगाल येथे राष्ट्रपती शासन लागू करण्याची गरज आहे.  हिंदूंवरील अत्याचारांचा निषेध आंदोलनातून आम्ही करत आहोत. देशभरात आज विविध ठिकाणी आंदोलन होत असून पश्चिम महाराष्ट्र प्रांतात विविध भागात सुमारे ५० पेक्षा अधिक ठिकाणी आंदोलने झाली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन

‘भारतीय वारकरी मंडळा’ची भजन सेवा पुणे– हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती...

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....