पुणे-पुण्यात लवकरच एक अत्याधुनिक डायलिसिस केंद्र पाहायला मिळणार आहे, जे विशेषतः वंचित रुग्णांची काळजी घेण्यासाठी तयार केले गेले आहे. पुण्यधाम आश्रम तर्फे आणखी एक उदात्त उपक्रम हाती घेतला गेला आहे – ‘पुण्यधाम क्लोव्हर डायलिसिस सेंटर’, जो गुरुवार, २३ नोव्हेंबर २०२३ रोजी सुरू होणार आहे.“डायलिसिस उपचार केवळ वेदनादायक नाही तर ते महाग देखील आहेत. हे अत्याधुनिक डायलिसिस केंद्र अशा गरजूंना आरामदायी आणि सुरक्षित डायलिसिस उपचार प्रदान करेल ज्यांना त्याची गरज आहे परंतु उपचार परवडत नाहीत”, असे विश्व जागृती मिशन ट्रस्टचे अध्यक्ष कृष्ण कश्यप म्हणाले.
वातानुकूलित, धूळमुक्त वातावरणात असलेले हे डायलिसिस केंद्र १४ खाटा आणि १४ डायलिसिस मशीनने सुसज्ज आहे.
हे डायलिसिस सेंटर क्लोव्हर बिल्डर्सच्या यांच्या उदार योगदानामुळे शक्य झाले. क्लोव्हर बिल्डर्सचे संचालक राज भन्साळी म्हणतात, “पुण्यधाम आश्रमाच्या या उत्तुंग उपक्रमात नम्र योगदान देणे ही आमच्यासाठी विशेष बाब आहे”.
हे केंद्र लवकरच पात्र रुग्णांसाठी खुले करण्यात येणार आहे. “शेअरिंग इज केअरिंग” यावर आमचा विश्वास आहे, म्हणून हे डायलिसिस सेंटर”, असे क्लोव्हर बिल्डर्सचे संचालक धीरेन नंदू यांनी सांगितले.
पुण्यधामच्या मुकुटातील हा आणखी एक मानाचा तुरा आहे, इतर अनेक सामाजिक उपक्रमाद्वारे त्यांनी आपले साहाय्य देऊ केले आहे.
पुण्यधाम आश्रमाबद्दल:
विश्व जागृती मिशन ट्रस्ट, पुणे ही एक ना-नफा संस्था आहे जी पुण्यधाम आश्रम चालवते, मुख्यतः ज्येष्ठ नागरिकांचे हे घर, पिसोली, पुणे येथे सुंदर, शांत परिसरामध्ये आहे. या परिसरात एक वैभवशाली श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर, कैलास पर्वताचे भव्य शिखर, एक देदीप्यमान साई मंदिर, ५५ हून अधिक देशी गायी असलेली गोशाळा आणि कृष्ण अवतार सांस्कृतिक भवन आहे ज्यामध्ये एकावेळी ३००० लोक सामावून घेता येतात आणि ते सामाजिक, आध्यात्मिक कार्यासाठे वापरले जाते. याशिवाय पुण्यधाम आश्रम नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित कुटुंबांचे पुनर्वसन, महाराष्ट्रातील बंडखोरीग्रस्त भागातील पात्र मुलींच्या शिक्षणाचे प्रायोजकत्व, गरीब आणि निराधार शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी सामूहिक विवाह, वैद्यकीय शिबिरे आणि प्रेरक अशा अनेक सामाजिक कल्याणकारी उपक्रम राबवतो. त्यात येरवडा कारागृहातील महिला कैद्यांसाठी कार्यक्रम वगैरे सुद्धा येतात..