राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप:महाराष्ट्राची प्रौढ लोकसंख्या 9.54 कोटी तर 9.7 कोटी मतदार कसे?

Date:

नवी दिल्ली- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत अनियमितता झाली असल्याचा आरोप लोकसभेतील काँग्रेसची विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला आहे. या संदर्भात राहुल गांधी, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यामध्ये आम्हाला अनेक अनियमित आढळल्या असल्याचे यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले. निवडणूक आयुक्त निवडण्याची पद्धत देखील सरकारने बदलली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

या संदर्भात राहुल गांधी म्हणाले की, लोकसभेपूर्वी 32 लाख मते आणि विधानसभेपूर्वी 39 लाख मते जोडली गेली. 5 महिन्यांत 7 लाख नवीन मतदार जोडले गेले आहेत. आम्ही निवडणूक आयोगाला याची चौकशी करण्यास सांगितले. आम्ही मतदार यादी, नावे आणि पत्ते मागवले आहेत. त्यांची छायाचित्रेही द्यावीत अशी आमची मागणी आहे. आम्हाला लोकसभा आणि विधानसभेची मतदार यादी हवी आहे. अनेक मतदारांची नावेही हटवण्यात आली आहेत. ही दलित, अल्पसंख्याक मते आहेत. मी कोणतेही आरोप करत नाही, पण काहीतरी गडबड आहे का? असा आमचा प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मी संसदेतही माझ्या भाषणात हीच गोष्ट मांडली होती. 5 वर्षात जेवढे मतदार जोडले गेले त्यापेक्षा 5 महिन्यात जास्त मतदार जोडले गेल्याचे सांगण्यात आले. हिमाचलच्या मतदार यादी एवढे मतदार यात समाविष्ट केले आहेत. महाराष्ट्राची प्रौढ लोकसंख्या 9.54 कोटी आहे. तर निवडणूक आयोगाच्या मते 9.7 कोटी मतदार असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

महाराष्ट्रात 9 कोटी 54 लाख लोकसंख्या असताना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी 39 लाख मतदान वाढले असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. पाच वर्षात 34 लाख मतदार वाढले आहेत. त्यामुळे आम्हाला नाव आणि पत्त्यासह मतदार यादी हवी असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या पौढ लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. पाच महिन्यात एवढे मतदार कसे वाढले? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रामध्ये आमची मतदानाची संख्या कमी झालेली नाही. लोकसभा निवडणुकीत आम्हाला जेवढी मते मिळाली तेवढीच मते आम्हाला विधानसभा निवडणुकीत देखील मिळाली आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत मतदारांची जी संख्या वाढली तेवढेच मते ही भारतीय जनता पक्षाची वाढली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राज्यात आमची मते कमी झालेली नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपसह निवडणूक आयोगावर या आधी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेत बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील शिर्डी येथील नवीन मतदारांचा प्रश्न उपस्थित केला होता. या वेळी राहुल गांधी म्हणाले होते की, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जितके 5 वर्षात मतदार जोडले गेले नाहीत तितके शेवटच्या 5 महिन्यात जोडले गेले, असे म्हणत राहुल गांधी यांनी शिर्डी येथील नवीन मतदारांवर भाष्य केले होते. ते म्हणाले, शिर्डीच्या एका इमारतीमध्ये 7 हजार नवमतदार वाढले. मी कुठला आरोप करत नाही परंतु काही ना काही संशयास्पद आहे हे दिसत आहे. हिमाचल प्रदेशातील लोकसंख्येइतके मतदार नव्याने समाविष्ट होतात. आम्ही निवडणूक आयोगाकडे लोकसभा मतदार यादी, नाव आणि पत्ते मागितले आहेत. नवे मतदार बहुतांश अशा मतदारसंघात वाढले आहेत जिथे भाजप पराभूत झाली होती. हा डेटा आमच्याकडे आहे. तसेच निवडणूक आयुक्तांची निवड पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांच्या कमिटीने करायची होती. सरन्यायाधीशांना कमिटीमधून का हटवण्यात आले?, असा सवाल देखील राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित होता.

राहुल गांधींनी उपस्थित केले तीन मुद्दे…
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी गैरप्रकार केल्याचा दावा करताना राहुल गांधींनी तीन मुद्दे उपस्थित केले आहेत.

१. “विधानसभा निवडणूक २०१९ ते लोकसभा निवडणूक २०२४ या पाच वर्षांत ३२ लाख मतदारांचा याद्यांमध्ये नव्याने समावेश करण्यात आला. पण लोकसभा २०२४ ते विधानसभा २०२४ या पाच महिन्यांत ३९ लाख नवे मतदार समाविष्ट झाले. लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्यांत समाविष्ट झालेले मतदार आधीच्या पाच वर्षांतल्या मतदारांपेक्षा जास्त कसे? हे ३९ लाख मतदार कोण आहेत? आख्ख्या हिमाचल प्रदेशमध्ये ३९ लाख मतदार आहेत. आणि तेवढे नवे मतदार महाराष्ट्रात मतदार याद्यांमध्या समाविष्ट झाले आहेत”, असा मुद्दा राहुल गांधींनी उपस्थित केला.

२. “महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही महाराष्ट्रातील एकूण नोंदणीकृत मतदार जास्त कसे होतात? सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ९.५४ कोटी आहे. पण निवडणूक आयोगानुसार महाराष्ट्रात त्याहून जास्त म्हणजे ९.७ कोटी मतदार आहेत. लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अचानक हे मतदार तयार करण्यात आले आहेत”, असा दावा राहुल गांधींनी केला.
३. “महाराष्ट्रात विरोधी पक्षांना जितक्या मतदारांनी मतदान केलं त्यांची संख्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान अजिबात कमी झालेली नाही. काँग्रेसला लोकसभेत कामठी विधानसभा मतदारसंघात १.३६ लाख मतं मिळाली. विधानसभेत आम्हाला तिथेच १.३४ लाख मतं मिळाली. यात फारसा फरक पडलेला नाही. पण या काळात या मतदारसंघात ३५ हजार नव्या मतदारांचा समावेश झाला आहे. दुसरीकडे भाजपाला लोकसभेत १.९ लाख मतं मिळाली होती. विधानसभेत त्यांना १.७५ लाख मतं मिळाली. यातले बहुतेक मतदार हे त्या नव्याने समाविष्ट झालेल्या ३५ हजार मतदारांमधून आले. हे फक्त एका मतदारसंघातलं नाहीये. हे अनेक मतदारसंघांमध्ये दिसतंय. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मतदारसंघांमध्ये हे दिसून आलं आहे”, असा दावा राहुल गांधींनी केला आहे. महाराष्ट्रात आमची मतं कमी झालेली नाहीयेत, भाजपाची वाढली आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘महाराजांचा अपमान करा आणि पळून जा, फडणवीसांची नवी योजना’, हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

पुणे-काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यात होणाऱ्या महाराजांच्या...

भारतीय सेना दल आणि पुनीत बालन ग्रुप संयुक्त विद्यमाने ‘युगांतर २०४७ चे’ आयोजन

भरती विभाग पुणे आणि पुनीत बालन ग्रुपच्या सहकार्याने आयोजन सैन्यात...

“रंग रूप” भारतीय नाट्यशास्त्रावर होणार मंथन!

तीन दिवस राष्ट्रीय परिसंवाद: पुणे: सांस्कृतिक कार्य विभाग परिषद, महाराष्ट्र राज्य...

पुणेकर अनुभवणार शास्त्रीय नृत्यकलेचा अद्भभूत आविष्कार

नृत्यगुरु पंडिता रोहिणी भाटेंना ५०० पेक्षा जास्त नृत्यांगनांची आदरांजली २२-...