53% प्रतिसादकर्त्यांनी घराच्या सुरक्षेसाठी प्रगत तंत्रज्ञानाला दिले प्राधान्य

Date:

राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या निमित्ताने गोदरेज एंटरप्राईज ग्रुपच्या ‘हॅपिनेस सर्व्हे’ मधून समोर आलेला निष्कर्ष

गोदरेज एंटरप्राईज ग्रुपच्या सिक्युरिटी सोल्युशन्स व्यवसायाने प्रवासादरम्यान मनःशांती राहावी यासाठी सुरक्षा तंत्रज्ञानाविषयी जागरूकता वाढत असल्याचे अधोरेखित केले ~

पुणे , 24 जानेवारी, 2025: राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या पार्श्वभूमीवर, गोदरेज एंटरप्राईज ग्रुपच्या सिक्युरिटी सोल्युशन्स बिझनेसने केलेल्या ‘हॅपिनेस सर्व्हे’ मध्ये घराच्या सुरक्षेसाठी 53% प्रतिसादकर्त्यांनी प्रगत तंत्रज्ञानाला प्राधान्य दिले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रवासादरम्यान मनःशांती सुनिश्चित करणाऱ्या नाविन्यपूर्ण आणि स्मार्ट सुरक्षा उपायांसाठी ग्राहकांची वाढती पसंती यातून दिसून येते.

राष्ट्रीय पर्यटन दिन भारताच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे किती महत्त्वपूर्ण योगदान आहे याची  आठवण करून देतो. 2027 पर्यंत हे क्षेत्र देशांतर्गत प्रवास बाजारपेठेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी सज्ज आहे. एकट्या 2024 मध्येच या क्षेत्राने परकीय चलनात 25,010 कोटी रु. पेक्षा जास्त उत्पन्न मिळवले. प्रवास, पर्यटनाचे प्रमाण वाढत असताना घर सुरक्षित ठेवणे प्रवाशांसाठी महत्त्वाचे ठरले आहे. तसे झाले तरच प्रवासादरम्यान मन:शांती टिकून राहू शकते. प्रगत सुरक्षा तंत्रज्ञानाचा स्वीकार ही सर्वोच्च प्राधान्याची गोष्ट असल्याचे स्पष्ट होत असताना संशोधन अभ्यासातून असेही दिसून आले की 50% घरमालक हे तंत्रज्ञान वापरायला सोपे असणे महत्त्वाचे आहे असे मानतात तर 44% लोकांसाठी विश्वासार्हता हा महत्त्वाचा घटक आहे. हे निष्कर्ष अखंड संरक्षण सुनिश्चित करणारे स्मार्ट, वापरण्यास सुलभ सुरक्षा प्रणालींसाठी वाढती मागणी अधोरेखित करतात.

सर्वेक्षणातील निष्कर्षांवर भाष्य करताना गोदरेज एंटरप्राईज ग्रुपच्या सिक्युरिटी सोल्युशन्स व्यवसायाचे ईव्हीपी आणि बिझनेस हेड श्री. पुष्कर गोखले म्हणाले, “आमच्या हॅपिनेस सर्व्हेमधून असे दिसून आले आहे की ग्राहकांची मानसिकता सतत बदलत आहे. प्रवासादरम्यान आपल्या घरांचे रक्षण करण्यासाठी ते स्मार्ट आणि प्रगत सुरक्षा उपायांचा अवलंब करत आहेत. आजच्या एकमेकांशी जोडलेल्या जगात जिथे पर्यटन वेगाने वाढत आहे तिथे तांत्रिकदृष्ट्या प्रगत उपायांद्वारे घराचे केवळ प्रत्यक्ष संरक्षण होते असे नाही तर एकूणच स्वास्थ्य चांगले राहण्यात योगदान दिले जाते. गोदरेजमध्ये आम्ही ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सहजपणे सामावणाऱ्या आणि त्यांची सुरक्षितता व आनंद वाढवणाऱ्या गृह सुरक्षा उत्पादन सुविधांसह सक्षम करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

आधुनिक जीवनशैलीतील प्रवासाच्या वाढत्या भूमिकेचे महत्त्व दर्शवत राष्ट्रीय पर्यटन दिन भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाची, परंपरेची आठवण करून देतो. अधिकाधिक व्यक्ती देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणांना भेट देत असताना त्यांच्या अनुपस्थितीत घरे आणि मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करण्याची गरज कधी नव्हती तेवढी आता जास्त झाली आहे. लोकांची ही वाढती काळजी वा चिंता शमविण्यासाठी गोदरेज एंटरप्राईज ग्रुपचा सिक्युरिटी सोल्युशन्स व्यवसाय एआय-सक्षम सर्व्हिलन्स कॅमेरे, इंट्रूजन अलार्म सिस्टीम्स आणि व्हिडिओ डोअर फोन्स यांसारखी उत्पादनांची विस्तृत श्रेणी सादर करतो. त्यामुळे घरमालकांना दूरस्थ देखरेख क्षमता आणि सक्रिय सुरक्षा सूचना मिळतात.

हॅपिनेस सर्व्हेने दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता आणि चेन्नईसह 12 प्रमुख शहरांतील 2,400 प्रतिसादकर्त्यांकडून माहिती गोळा केली. त्यातून ग्राहकांच्या पसंती व सुरक्षा गरजांवर सर्वसमावेशक दृष्टिकोन मिळाला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भारतीय सेना दल आणि पुनीत बालन ग्रुप संयुक्त विद्यमाने ‘युगांतर २०४७ चे’ आयोजन

भरती विभाग पुणे आणि पुनीत बालन ग्रुपच्या सहकार्याने आयोजन सैन्यात...

“रंग रूप” भारतीय नाट्यशास्त्रावर होणार मंथन!

तीन दिवस राष्ट्रीय परिसंवाद: पुणे: सांस्कृतिक कार्य विभाग परिषद, महाराष्ट्र राज्य...

पुणेकर अनुभवणार शास्त्रीय नृत्यकलेचा अद्भभूत आविष्कार

नृत्यगुरु पंडिता रोहिणी भाटेंना ५०० पेक्षा जास्त नृत्यांगनांची आदरांजली २२-...

जिल्हा ग्राहक संरक्षण समिती बैठकीत केलेल्या सूचनांची प्रशासनाच्यावतीने दखल

प्रकरणे वेळेत निकाली काढण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देश पुणे,...