पुणे: अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या श्री मंडई म्हसोबा दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. हा विशेष सोहळा धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्यप्रेरित आनंद आश्रम येथे पार पडला.
यावेळी खासदार नरेश म्हस्के देखील उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांनी एकनाथ शिंदे यांचा सन्मान करून त्यांचे आभार मानले. ट्रस्टचे सदस्य सुधीर साकोरे, राज वांजळे, वेदांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
एकनाथ शिंदे त्यांनी ट्रस्टच्या कार्याची माहिती घेतली आणि कार्य अहवालाचे कौतुक केले. यावेळी त्यांनी ट्रस्टच्या सदस्यांना एकत्र राहून धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देण्याचे आवाहन केले. श्री मंडई म्हसोबा दिनदर्शिका हा धार्मिक कार्याचा एक उत्तम मार्गदर्शक असून त्याला महाराष्ट्रभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली.