Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुणे महापालिका निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणाची सोडत …

Date:

पुणे – महापालिकेच्या निवडणुकीसाठी ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी उद्या दि. २९रोजी सोडत काढली जाणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी अ, ब, क असे तीन सदस्य संख्येचे ५७ तर दोन सदस्य संख्येचा एक असे एकूण ५८ प्रभागातून १७३ नगरसेवक निवडले जाणार आहेत. यापूर्वी ओबीसी आरक्षणाशिवाय निघालेल्या सोडतीमध्ये २३ जागा अनुसूचित जाती व दोन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव झालेल्या आहेत. आता उर्वरित १४८ जागांमधून ओबीसी प्रवर्गाच्या ४६ आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ५१ जागांवर आरक्षण काढण्यासाठी सोडत काढली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या १५ डिसेंबर २०२१ रोजी काढलेल्या राजपत्राचा आधार घेतला जाणार आहे.

अशी काढली जाणार सोडत

– एकूण ५८ प्रभागांपैकी २४ प्रभागांमध्ये अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण आहे. त्यामुळे उर्वरित ३४ प्रभागातील ‘अ’ जागा ओबीसी सर्वसाधारण गटासाठी आरक्षित केली जाईल.

– ओबीसीच्या ४६ पैकी उर्वरित १२ जागा या अनुसूचित जाती व जमातीचे सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण आहे अशा प्रभागातील ‘ब’ जागेवर सोडत काढली जाईल.

– अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण असलेल्या प्रभागात ‘ब’ जागा ओबीसीसाठी आरक्षित केली जाईल.

– जर संबंधित प्रभागात अनुसूचित जाती किंवा जमातीचे सर्वसाधारण गटाचे आरक्षण असेल तर अशा प्रभागात ‘ब’ जागा आपोआप ओबीसी महिलांसाठी आरक्षित होईल. तर ‘अ’ जागा अनुसूचित जाती किंवा जमातीच्या महिलांसाठी आरक्षित असेल तर तेथील ‘ब’ जागा ओबीसी सर्वसाधारण गटासाठी आरक्षित होईल.

– यामध्ये जेवढ्या जागा ओबीसी महिलांसाठी आरक्षित होतील तेवढ्या वजा करून उर्वरित ओबीसी महिलांचे आरक्षण करण्यासाठी ३४ प्रभागातील जागेवर सोडत काढली जाईल.

– अशाप्रकारे ओबीसीच्या ४६ पैकी २३ जागा सर्वसाधारण गटासाठी व २३ जागा महिलांसाठी आरक्षित केल्या जातील.

– ओबीसीच्या आरक्षणाची प्रक्रिया संपल्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे आरक्षण काढले जाईल.

– एकूण ५८ पैकी ज्या २२ प्रभागात कोणत्याही प्रवर्गातील महिलांसाठी जागा आरक्षित नाही, अशा प्रभागात सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी एक जागा थेट दिली जाईल.

– त्यानंतर ज्या प्रभागात तीन पैकी दोन जागांवर कोणतेही आरक्षण पडलेले नाही अशा प्रभागातील ‘ब’ जागेवर सर्वसाधारण महिलेचे आरक्षण निश्चित केले जाईल. अशा २२ ते २३ जागा आरक्षीत होतील.

– ५१ पैकी उर्वरित सहा ते सात सर्वसाधारण गटातील महिलांचे आरक्षण काढण्यासाठी ज्या १२ प्रभागात अनुसूचित जाती किंवा जमातीच्या सर्वसाधारण गटासाठी आरक्षीत असलेली ‘अ’ जागा, ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण आहे अशी ‘ब’ जागा आहे, अशा प्रभागातील ‘क’ जागेवर सोडतीद्वारे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षीत केली जाईल.

– १२ प्रभागांपैकी सहा ते सात प्रभागातील ‘क’ जागा महिलांसाठी आरक्षीत होणार आहे, त्यामुळे या प्रभागातील पुरुषांचा पत्ता कट होणार आहे.

– यामुळे प्रभाग क्रमांक १, ७, ८, ११, १२,१४, १९,२२, २७, ३७, ३८, ५० या प्रभागांपैकी काही प्रभागातील दिग्गजांना धक्का बसणार आहे, त्यामुळे त्यांना दुसऱ्या प्रभागात उमेदवारीसाठी प्रयत्न करावे लागतील.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्रातील 700 मंदिरांत वस्त्रसंहिता,150 आणखी मंदिरांत नियम लागू होणार

नागपूर - महाराष्ट्रामध्ये 700 पेक्षा जास्त तर देशभरात...

राहुल गांधींचा ताफा अडवणे ही हुकुमशाही, मुलभूत अधिकारांवर घाला.

कर्नल सोफिया यांचा अपमान करणाऱ्या मंत्री विजय शाहांना तत्काळ...

“अहिल्याबाईंच्या विचारांप्रमाणे समाजासाठी न्यायदायी कार्य करण्याचा निर्धार” — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन करत...