Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

लोकसेवा ई स्कूल पाषाणचा सलग सातव्या वर्षी 100% निकाल

Date:

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत लोकसेवा ई-स्कूल पाषाणची सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाली असून शाळेचा सलग सातव्या वर्षी 100 टक्के निकाल लागला आहे. रथीन पंचवटीकर याने 96.4 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, द्वितीय क्रमांक मिळवलेल्या कपिल मुळे यास 96.2 टक्के आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या संतोष बोथिराजा व प्रथम मोदी यांनी 96 टक्के गुण मिळवले आहेत. रथीन पंचवटीकर, प्रथम मोदी व ऋषीचरण कोंथम या विद्यार्थ्यांनी सामजिक शास्त्र या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले. परीक्षादेखील ऑनलाईन झाल्या. त्यामुळे प्रत्यक्ष परीक्षेचा सराव नसताना आणि ऑफलाईन परीक्षा होऊनही विद्यार्थ्यांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. शाळेचा निकाल 100% लागल्याने येथील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे, शिक्षण संचालक निवेदिता मडकीकर, प्राचार्या जया चेतवाणी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

जिल्हा स्तरीय फुटबॉल स्पर्धेत नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचा विजय

पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने तळेगाव दाभाडे येथे सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल चषक जिल्हा स्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये जिल्ह्यातील एकूण 25 शालेय संघ सहभागी झाले होते. यामध्ये लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांची सैनिकी शाळा फुलगाव च्या 17 वर्षे वयोगटातील संघाने विजेतेपद तर, 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी उपविजेते पद पटकाविले आहे. अंतिम सामन्यात लय पा या सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यास मॅन ऑफ द टूर्नामेंट चा पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे, शिक्षण संचालक नरहरी पाटील, प्राचार्य अमर क्षीरसागर, प्राचार्य शोपिमुन, प्राचार्य देणसिंग, प्राचार्या लक्ष्मी कुलकर्णी, प्रशासन प्रमुख अर्जुन शिंदे यांनी सर्व विद्यार्थी व प्रशिक्षक संतोष जाधव व किरण पिसे यांचे अभिनंदन केले.

लोकसेवा ई स्कूल पाषाण मध्ये कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी एअर व्हाइस मार्शल (निवृत्त) नितीन शंकर वैद्य यांनी दृकश्राव्य माध्यमाच्या साहाय्याने आपण कारगिल युद्ध कसे जिंकले? याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
कारगिल विजय दिवसानिमित्त लोकसेवा ई-स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली आणि भारतीय सैनिकांना मानवंदना दिली. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या जया चेतवाणी, एसबीआय बँकेचे निवृत्त वरिष्ठ व्यवस्थापक विद्याधर देशपांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजाभाऊ सुतार, पुणे शहर भाजपाचे उपाध्यक्ष राहुल कोकाटे, सुनील भाले, सामाजिक कार्यकर्ते विनोद पेंढारकर, कृषी सल्लागार डी. बी. पेंडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

देशभक्तीपर गीते आणि भाषणांनी लोकसेवा शैक्षणिक संकुल, फुलगाव येथे आज कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. विजय दिनाचा आनंद साजरा करतानाच शहीद जवानांना यावेळी अभिवादन करण्यात आले.

यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानिमित्त विविध शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड तर्फे शाळेला मिळालेले ‘गोल्डन स्कूल अवार्ड’ प्राचार्य अमर क्षीरसागर यांना सुपूर्द करण्यात आले. प्राचार्य अमर क्षीरसागर यांनी देशसेवा विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...