Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

भाजपा मध्ये लोढा तर शिंदे गटात तानाजी सावंत सर्वाधिक श्रीमंत मंत्री:70% मंत्र्यांविरुद्ध गुन्हेगारी प्रकरणे

Date:

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्याच्या 39 दिवसांनी मंगळवारी महाराष्ट्रात शिंदे मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला. यात एकूण जणांना 18 कॅबिनेटमध्ये संधी मिळाली. यात भाजपच्या 9 आणि शिंदे गटातील 9 जणांचा समावेश आहे. या नव्या मंत्रिमंडळातील प्रत्येक जण कोट्यधीश आहे. त्यापैकी सर्वात श्रीमंत भाजपचे मलबार हिल्स मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा आहेत. त्याचबरोबर सर्वात कमी म्हणजे 2 कोटींची मालमत्ता पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांच्याकडे आहे.शिंदे गटाच्या 9 मंत्र्यांपैकी तानाजी सावंत हे 115 कोटींसह सर्वाधिक श्रीमंत असून त्याखालोखाल 82 कोटी संपत्तीसह दीपक केसरकर आहेत. 20 कोटी संपत्तीसह अब्दुल सत्तार यांचा तिसरा क्रमांक लागतो. यानंतर शंभुराज देसाई 14 कोटी, दादा भुसे 10 कोटी, संजय राठोड 8 कोटी, गुलाबराव पाटील 5 कोटी, उदय सामंत 4 कोटी संपत्तीचे मालक आहेत. तर संदीपान भुमरे हे 2 कोटी संपत्तीसह मंत्र्यांपैकी सर्वात कमी श्रीमंत आहेत.

बांधकाम व्यावसायिक आहेत लोढा-पेशाने बांधकाम व्यावसायिक असलेले मंगल प्रभात लोढा हे भारतीय जनता पक्षाचे सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. 2011च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे 441 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. 6 वेळा आमदार राहिलेल्या लोढा यांच्याकडे 252 कोटी रुपयांची जंगम आणि 189 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे 14 लाख रुपयांची जग्वार कार असून इतर बाँड आणि शेअर्समध्ये गुंतवणूक आहे. दक्षिण मुंबईतही त्यांचे पाच फ्लॅट आहेत. त्यांचा राजस्थानमध्ये प्लॉट असून त्यांच्या पत्नीचे मलबार हिल परिसरात घर आहे. प्रतिज्ञापत्रानुसार लोढा यांच्यावर 5 गुन्हे दाखल आहेत.

मंत्रिमंडळातील 70 टक्के मंत्र्यांविरुद्ध केसेस

शिंदे सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात 12 मंत्री असे आहेत, ज्यांच्यावर विविध प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. यातील काही जणांवर गंभीर कलमेही लावण्यात आली आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 18, तर उपमुख्यमंत्र्यांवर 4 गुन्हे दाखल आहेत. म्हणजेच सध्याच्या शिंदे मंत्रिमंडळात असे 70 टक्के मंत्री कलंकित आहेत.

भाजपच्या 9 पैकी 7 मंत्र्यांविरुद्ध गुन्हेगारी प्रकरणे

मंत्रिमंडळातील भाजपचे नंदुरबार पूर्वचे आमदार विजयकुमार गावित यांच्याविरुद्ध सर्वाधिक 9 गुन्हे दाखल आहेत, तर त्याखालोखाल औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांच्याविरुद्ध 6, मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांच्याविरुद्ध 5 गुन्हे दाखल आहेत. तर रवींद्र चव्हाण आणि सुरेश खाडे यांच्याविरुद्ध प्रत्येकी 3 गुन्ह्यांची नोंद आहे. यानंतर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध प्रत्येकी 2 गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले आहे. तर गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरुद्ध एकाही गुन्ह्याची नोंद नाही.

शिंदे गटातील 9 पैकी 5 जणांविरुद्ध गुन्हेगारी प्रकरणे

शिंदे गटातील मंत्र्यांपैकी सर्वाधिक 9 गुन्ह्यांची नोंद पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांच्याविरुद्ध आहे. त्याखालोखाल 8 गुन्ह्यांसह अब्दुल सत्तार यांचा क्रमांक लागतो. तर संजय राठोड यांच्याविरुद्ध 4 गुन्ह्यांची नोंद आहे. याशिवाय दादा भुसे आणि गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध प्रत्येकी एका गुन्ह्याची नोंद आहे. दरम्यान, शिंदे गटाचे तानाजी सावंत, दीपकर केसरकर, उदय सामंत, शंभुराज देसाई यांच्याविरुद्ध एकाही गुन्ह्याची नोंद नाही.

भाजप मंत्र्यांमधील श्रीमंती …

शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या 18 मंत्र्यांमध्ये भाजपचे 9 मंत्री आहेत. यातील भाजपच्याच मंत्र्यांबद्दल बोलायचे झाल्यास मंगलप्रभात लोढा हे सर्वाधिक 441 कोटींपेक्षा जास्त संपत्तीचे मालक आहेत. त्या खालोखाल विजयकुमार गावित 27 कोटी संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. यानंतर गिरीश महाजन 25 कोटी, राधाकृष्ण विखे 24 कोटी, अतुल सावे 22 कोटी यांचा क्रमांक लागतो. यानंतर 11.4 कोटींसह सुधीर मुनगंटीवार असून, त्याखालोखाल 9 कोटींसह रवींद्र चव्हाण आहेत. तर सुरेश खाडे हे 4 कोटी संपत्तीसह सर्वात कमी श्रीमंत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यातील मातब्बर नेते दीपक मानकर यांचा अजित पवारांकडे राजीनामा…

पुणे- शहरातील मातब्बर म्हणून गणल्या जाणाऱ्या आणि नेतृत्वाच्या मुख्य...

पुण्याचा महापौर भारतीय जनता पार्टीचाच होणार हा विश्वास – धीरज घाटे

पुणे ता १३ ;- लोकसभा निवडणूक खासदार , विधानसभे...

धीरज घाटे हेच पुन्हा भाजपचे शहर अध्यक्ष…

पुणे :भारतीय जनता पार्टीने आज (ता.13 मे)...

पुणे विद्यार्थी गृहाचा ११६ वा वर्धापनदिन उत्साहात

कुलगुरू दादासाहेब केतकर यांना अभिवादन पुणे : गरीब व होतकरू...