पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार गिरीश बापट रुग्णालयात दाखल आहेत. श्वसनाचा त्रास होत असल्याने गेल्या २० ते २५ दिवसांपासून गिरीश बापट यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृती बाबत सर्व क्षेत्रातील लोकांना ,मान्यवरांना चिंता व्यक्त होते आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दीनानाथ रुग्णालयात जाऊन खासदार गिरीश बापट यांच्या प्रकृतीची विचारणा केली. त्यांनी गिरीश बापट यांच्यासोबत संवाद देखील साधला. यावेळी बापट यांनी, मी आता बरा आहे, लवकरच परत येईन, असा शब्द शरद पवारांना दिला.
गिरीश बापट यांचा स्वभाव आणि पुण्यामध्ये भाजपसाठी त्यांनी केलेल्या कामाची नेहमीच प्रशंसा होते. पुण्यामध्ये राजकीय संस्कृती जोपासणारे बापट पहिले असल्याचंही बोललं जातं. म्हणून राजकीय नेत्यांची मैत्री किंवा आधाराचं नातं पाहायला मिळतं.शरद पवार भेटण्यासाठी आले असता, तुम्ही जास्त बोलू नका, आराम करा, असा सल्ला पवारांनी दिला. बापट यांना श्वसनाचा त्रास असल्या कारणाने, तुम्हाला जास्त बोलत येत नाही, किती महिन्यांपासून हा आजार सुरू आहे? अशी एकूण प्रकृती बाबत विचारणार करणारे प्रश्न शरद पवार यांनी विचारले.मी गेल्या दोन महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात गेलो होतो, तेव्हापासून मला आजार सुरू झाला, असं गिरीश बापट म्हणाले.