दोन दिवसात माघारी फिरा अन्यथा
पुणे- एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्रातल्या शिवसैनिकात संतापाची लाट उसळते आहे शनिवारीपुण्यात तानाजी सावंत यांच्या ऑफिसची संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. ठाकरेंच्या समर्थनार्थ , ठाकरे आणि शिवसेना नावावर मोठ्ठे झालेल्या तानाजी सावंत यांच्या कात्रज येथील कार्यालयावर नगरसेवक विशाल धनवडे आणि सैनिकांनी जोरदार हल्ला केला.
बालाजीनगर येथे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचे सावंत विहार या इमारतीत मे. भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडचे कार्यालय आहे. तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा देत बंडखोर आमदारांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करत राडा घातला. “ज्या आमदारांनी बंड केले आहे. ते शिवसेनेमुळे मोठे झाले आहे. त्या सर्वांनी हे विसरता कामा नये. जे आमदार तिकडे गेले आहेत त्या सर्वांनी पुन्हा यावे, अन्यथा आज तानाजी सावंत यांच्या ऑफिसची अवस्था झाली आहे. तशी राज्यातील अनेक बंडखोर आमदारांची होईल”, असा इशारा शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी दिला आहे.
तत्पूर्वी गुरुवारी देखील उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ संत कबीर चौक, नाना पेठ येथे शिवसैनिकांनी पाठिंबा दर्शवण्यासाठी घोषणाबाजी केली होती . नगरसेवक विशाल धनवडे, गजाननजी पंडित, उमेशजी गालीदे, चंदन साळुंखे , स्वाती कथलकर , जावेद खान, रुपेश अप्पा पवार, संदीपजी गायकवाड, सनी गवते,मुकुंद चव्हाण, रवी निंबाळकर, योगेश खेंगरे,भाऊ शिंदे, राजेश राऊत, ज्ञाणंद कोंढरे, निलेश धनगर, शुभम दुगाने, सागर भोसले, बाबू परदेशी, परेश खांडके, कुणाल पवार, मयूर धनवडे, अनिकेत थोरात, सुनीता दगडे, गौरी हेंद्रे, आकाश शेरे ,वेंकयटेश पवार, कुणाल झेंडे,तुषार धनवडे , सनी मुसळे, विजय शेळके, शुभम धायगुडे, उवेज बेग, प्रतीक जळगावकर, अमोल धनवडे आदी शिवसैनिकानी यावेळी बंडखोरांना इशारा दिला होता .
शुक्रवारी कुर्ल्याचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकरांच्या कार्यालयावर काही लोकांनी हल्ला केला. त्यांनी गेटची तोडफोड केली. अहमदनगरमध्ये बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांच्या फोटोला काळे फासण्यात आले. तोडफोड करणारे लोक शिवसेनेचे असल्याचा आरोप बंडखोर आमदारांच्या समर्थकांनी केला आहे. तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिसांनी राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे.