आयुक्त कुणाचे? भाजपाचे कि राष्ट्रवादीचे ? कि नागरी हिताचे ? उपस्थित होऊ लागला प्रश्न
पुणे- आज महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे पुन्हा दुसऱ्यांदा अध्यक्षपद भूषविणारे हेमंत रासने यांनी आज महापालिका आयुक्त हे पुण्याच्या विकासात अडथळे निर्माण करत असल्याचा गंभीर आरोप केला . आणि महापालिका आयुक्त -प्रशासन यांच्या विकास विरोधी धोरणामुळे त्यांचा निषेध करत आजची स्थायी समिती सभा तहकूब केल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या वेळी या तहकुबीला राष्ट्रवादी, कॉंग्रेस , शिवसेना यापैकी कोणीही विरोध केला नाही .
महापौरांसह , स्थायी समिती च्या सूचना , आदेशांना आयुक्त जुमानत नाहीत ते राज्य शासनाचे प्रतिनिधी असतात . त्यांना पुन्हा शासनाच्या सेवेत पाठविण्याचा प्रस्ताव आणायचा कि नाही याबाबत, पुढचे प्रशासनाचे धोरण पाहून आम्ही विचार निश्चित करू असे त्यांनी सांगितले . रासने पुढे म्हणाले,’आता ते आमचे ऐकत नाहीत ,मागच्या वेळी एकदा प्रशासनाने आमची फसवणूक केली . या शहराचा विकास होऊ नये अशी त्यांची भूमिका आहे . अंदाजपत्रकात जो महसूल नोंदविला तो जमा करण्याची पालिकेची क्षमता आहे .