पुण्यातील झोपडपट्ट्यांमध्ये आपत्कालीन व्यवस्थापनाची प्रशिक्षण मोहीम सुरू ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट’ चा पुढाकार
पुणे :
आपत्कालीन परिस्थितीला हानी होऊ शकणार्या वस्त्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये आपत्कालीन व्यवस्थापनाबद्दल जनजागृती करण्यासाठी ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट’या संस्थेने पुण्यात प्रशिक्षण मोहीम हाती घेतली आहे. रविवारी सकाळी महात्मा गांधी झोपडपट्टी (पाटील इस्टेट, शिवाजीनगर) येथे ‘म्युनिच री-फाऊंडेशन’ (जर्मनी)चे प्रतिनिधी ख्रिस्तियन बार्टहेल्ट यांच्या आणि ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट’ तसेच ‘इंटरनॅशनल सेंटर ऑफ इक्वि-टी’ संस्थेचे संचालक डॉ. मुकेश कणसकर यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे उद्घाटन व प्रात्याक्षिक झाले.
‘स्लमलेवल डिझास्टर रिडक्शन रिपोर्ट’चे अनावरण देखील यावेळी ‘म्युनिच री-फाऊंडेशन’(जर्मनी) चे प्रतिनिधी ख्रिस्तियन बार्टहेल्ट या पाहुण्यांच्या हस्ते झाले.
संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी अशा वस्त्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, स्वयंपरीक्षण, नियोजन व्हावे असा या अहवालाचा उद्देश आहे. यावेळी ‘पपेट शो’ देखील सादर करण्यात आला.
‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट’ या संस्थेच्या आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रातील कार्याला आणि त्यातील महिलांच्या सहभागाला ‘ग्लोबल रिस्क अॅवार्ड-2015’ पारितोषिक मिळाले आहे. 62 देशातील 145 प्रकल्पांमधून संस्थेला प्रथम पारितोषिक मिळाले. ‘युनायटेड नेशन्स् ऑफिस फॉर डिझास्टार रिस्क रिडक्शन’ आणि ‘ग्लोबल रिस्क फोरम’ (दावोस) ‘रिस्क अॅवार्ड 2015’ प्रकल्प पुण्यात 2 झोपडपट्ट्यांमध्ये सुरू आहे. आणि एप्रिल 2016 पर्यंत 10 झोपडपटट्यांत हा प्रकल्प सुरू होणार आहे. अशी माहिती यावेळी डॉ. मुकेश कणसकर यांनी दिली.