शिवसृष्टीसाठी मुस्लीम समाज महापालिकेत …
पुणे-
वारंवार आश्वासने देण्यापेक्षा मेट्रो च्या बरोबर सुपरफास्ट मेट्रोच्या गतीने शिवसृष्टीचे काम तातडीने हाथी घ्या अशी मागणी करत आज शहरातील मुस्लीम समाजाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेपुढे जमून घोषणाबाजी केली आणि माजी उपमहापौर दीपक मानकर तसेच राष्ट्रवादीचे गटनेते चेतन तुपे ,कॉंग्रेसचे अरविंद शिंदे यांच्या समवेत आयुक्त कुणालकुमार यांना सभागृहातून बाहेर बोलावून कुणाल कुमार यांना निवेदन दिले .अखिल पुणे मुस्लीम समाज शिवसृष्टी पाठींबा समिती च्या वतीने हे निवेदन अब्दुल गफूर पठाण ,इक्बाल शेख,फिरोज मुल्ला ,हाजी फिरोज शेख,मुनवर भाई कुरेशी,मुश्ताक भाई पटेल,अंजुम इनामदार ,इब्राहीम् भाई खान आदींनी दिले .
शिवजयंती पूर्वी शिवसृष्टीचे भूमिपूजन करा अन्यथा मुस्लीम समज हे भूमिपूजन करेल असा इशारा हि या निवेदनातून देण्यात आला.