पुणे-मनसे ने आज कृषीअधिभाराच्या गोंडस नावाच्या खाली पेट्रोल डिझेलची दरवाढ करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णया विरोधात टिळक चौक अलका टॉकीज येथे आंदोलन केले.मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे , बाबू वागस्कर , प्रल्हाद गवळी ,राम बोरकर, नरेंद्र तांबोळी , आशिष देवधर , सुधीर धावडे , राहुल गवळी , सुनील कदम , सुहास निम्हण , किशोर चिंतामणी , राजेंद्र वेडे पाटील , वसंत खुटवड , सचिन काटकर ,भूपेंद्र शेडगे , सचिन पगारे, निलेश हांडे ,रवी सहाणे,अभिषेक थिटे सचिन ननावरे, अनिल परदेशी आदी सहित असंख्य महाराष्ट्र सैनिक यावेळी उपस्थित होते
यावेळी अजय शिंदे म्हणाले कि,’गेले २ आठवडे पुणे शहरात मनसे ने नागरिकांकडून पंतप्रधानांसाठी पत्राद्वारे पेट्रोलियम पदार्थाचे दर कमी करावे व गॅस ची ८ महिन्याची सबसिडी द्यावी सबसिडी पूर्ववत सुरु करावी हि मागणी करणारी मोहीम राबवण्यास सुरवात केली होती. उद्देश हाच होता या मोहिमेच्या माध्यमातून केंद्राला बजेट मध्ये पेट्रोलियम पदार्थाच्या वाढत्या किमतीवर लगाम घालण्या संदर्भात केंद्राने निर्णय घ्यावा .मात्र केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. यावेळी कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा आणि विकास करण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील अधिभार वाढवण्याची घोषणा केली आहे.पेट्रोलवर अडीच रुपये, तर डिझेलवर चार रुपये कृषी अधिभार आकारला जाणार आहे. परंतु, या वाढीचा ग्राहकांवर परिणाम होणार नसल्याचंही सरकारकडून यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे..असे असेल तरी सर्वसामान्यांना झटका देणारी ही बातमी आहे. कारण अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेल दर वाढीतुन सूट मिळून वाढीव दर कमी होऊन जनतेला दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती मात्र पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लावून पेट्रोल डिझेल चे आत्ताचे दर कायम राहणार असल्याचेच केन्द्र सरकारने सूचित केले आहे . हे सगळं कृषि अधिभार या गोंडस नावा खाली होणार आहे त्यातही दुर्देवाने वरील अधिभार जर छुप्या पद्धतीने लागू झाला तर पेट्रोलिंयम पदार्थ चे दर १०० रु च्या पलीकडे जातील परिणामी मोठ्या प्रमाणावर महागाई वाढेल म्हणून मनसे ने आज कृषीअधिभाराच्या गोंडस नावाच्या खाली पेट्रोलिंयम पदार्थ 100 पार नेण्याची पूर्वतयारी करणाऱ्या केंद्र सरकारच्या निर्णया विरोधात आंदोलन करत आहे.
त्याच बरोबर बजेटच्या माध्यमातून केंदाने कॅव्हिडच्या पार्श्ववभूमीवर सर्व सामान्य करदात्यांना मोठी सूट देणं अपेक्षित होते ती हि दिली नाही त्याच बरोबर नागपूर आणि नाशिकला मेट्रो ला भरघोस मदत केली मात्र पुण्याला ठेंगा दाखवत नागरिकांची घोर निराशाच केली आहे. असेही शिंदे यावेळी म्हणाले.