कसब्यावर हक्क कॉंग्रेसचा कि शिवसेनेचा? मविआमध्ये हलचल
पुणे-कसबा विधानसभा पोट निवडणुकीचे वारे आता वाहू लागले असताना आणि येथील निवडणूक मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे त्यांच्याच कुटुंबातील एका साठी सोडून बिनविरोध घ्यायची किंवा नाही ? यावर अजून महाविकास आघाडीतच एकमत झालेले नसताना आघाडीतील सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी लाट वगैरे काही नसल्याचा दावा करत आणि टिळकांच्या घरात आता कुठवर उमेदवारी द्यायची ? असे सवाल करत आपापली रणनीती आरंभ केली असून आज याच रणनीतीचा भाग म्हणून मोदी गणपती च्या परिसरात आघाडीच्या काही मान्यवरांनी चहापाणी करत एक बैठक घेतली .
या बैठकीत कसब्याचा उमेदवार म्हणून कॉंग्रेसने बाळासाहेब दाभेकारांना उमेदवारी दिली तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या काही मान्यवरांनी ज्यांचा कसब्यात प्रभाव आहे , अशांनी दाभेकर यांच्या पाठीशी राहून त्यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला . खुद्द या बैठकीनंतर दाभेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कि ,’ १९७२ पासून मी कॉंग्रेसचा सभासद आहे, पक्षाकडे मी फारसे काही कधी मागितलेले नाही , आणि आता मला कॉंग्रेस सह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मातब्बर लोकांकडून पाठींबा मिळतो आहे ज्यांच्या मागे मोठे जनमत आहे , त्यामुळे मी कॉंग्रेसच्या वतीने येथून इच्छुक आहे . आणि कॉंग्रेसने मला उमेदवारी दिली तर मी या सरावाच्या मदतीने निश्चित निवडून येऊ शकतो आणि भाजपचा बालेकिल्ला ढासळू शकतो .मात्र उमेदवारी कोणाला द्यायची हा सर्वस्वी प्रश्न पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा आहे तो घेतील तो निर्णय अर्थात आम्ही मान्य करू .
तर दुसरीकडे शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी मात्र चिंचवड जर कॉंग्रेसला देणार असाल तर कसबा शिवसेनेला दिलाच पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. ते म्हणाले , आजवर कसबा भाजपचा बालेकिल्ला राहिला असे बोलले जाते , पण त्यामागे शिवसेनेने त्यांना दिलेली साथ हे प्रमुख कारण आहे . कसब्यात भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार विजयी होत आले .महाविकास आघाडीत आता शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आहे हे बरोबर आहे पण इथे भाजपच्या उमेदवाराला टक्कर द्यायची असेल तर शिवसेनेचाच उमेदवार द्यायला हवा .आमचे पदाधिकारी आणि मी देखील आघाडीच्या स्थानिक नेत्यांकडे चहापाणी अगर अन्य बैठकांना जात असतो ,पण याचा रथ असा नाही किकॉंग्रेस च्या उमेदवाराला आताच आमच्याकडून कोणी पाठींबा दिला आहे. कस ब्यावर पहिला हक्क शिवसेनाचा आहे हे कॉंग्रेसने किंवा अन्य पक्षांच्या नेत्यांना ठाऊक आहे.