स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या ‘दस मे बस ‘ चा शुभारंभ
पुणे : मेट्रो आणि पीएमपी बससेवा इंटिग्रेटेड होणार आहे, त्यामुळे एकाच तिकीटात कोणत्याही पद्धतीने प्रवास करता येईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुलभ असेल तर नागरिकांकडून त्यास प्रतिसाद मिळतो. उच्च द्रुतगती उन्नत मार्गावर (एचसीएमटीआर) नियो मेट्रोचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविल्यास त्यासाठी निधी उपलब्ध होईल, पुण्यात प्रस्तावित असलेल्या एचसीएमटीआर मार्गावर ‘नियो मेट्रो’ केल्यास मेट्रोच्या खर्चाच्या २५ टक्के रक्कमेत ती पूर्ण होते.नियो मेट्रो केली तर केंद्र सरकारची मदतही मिळेल अशी सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पुणे महापालिकेतर्फे मध्यवर्ती भागातील वाहतूकीसाठी ‘पुण्य दशम’ या बससेवेचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महात्मा फुले मंडई येथे झाले. यावेळी भापजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे,महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते गणेश बिडकर ,उपमहापौर सुनिता वाडेकर आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी खा. गिरीश बापट आ. चंद्रकांत पाटील ,महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचीही भाषणे झाली.
फडणवीस म्हणाले, १० रुपयात कुठे ही प्रवास करता येईल ही योजना कल्प आहे. यामुळे प्रदुषण, वाहतूक कोंडी कमी होईल. नागरिकांना बसची माहिती मिळावी यासाठी अॅप सुरू करावे. देशात सर्वाधिक इलेक्ट्रीक बसेस पुण्यात वापरल्या जातात. चांगल्या सुविधा देऊन लोकांना सार्वजनिक वाहतूकीची सवय लावली पाहिजे.पीपीई खाली एक सेवा सुरू करतोय. काही लोकांनी मेट्रो आणली तेव्हा होईल की नाही असा प्रश्न केला होता. देशात दोनच मेट्रोने काम केलं त्यात एक नागपूर आणि दुसरे पुणे. आता एकाच तिकिटावर मेट्रो आणि बसने प्रवास करता येणार आहे. ट्रॅव्हल प्लॅन तयार केला जाणार आहे. 100 टक्के इंटिग्रेशन करता येईल. देशात सर्वाधिक टू व्हीलरची संख्या पुण्यात आहे. 45 लाख टू व्हीलर पुणे शहरात आहेत.गेल्या साडे चार वर्षात पुढच्या ५० वर्षाचा विचार करून महापालिकेने योजनांची कामे सुरू केली आहेत. काहींचे काम ५० टक्के झालेले आहे असेही फडणवीस यांनी सांगितले.
बापटसाहेब आपल्या मनासारखे होईल
केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू केले. पण त्यावर भाजपचे कमळ नाही, तरीही काही जण लस घेणार नाही म्हणाले. आता पुण्यात होणारी मेट्रो मोदीची आहे असे म्हणून बसणार नाही का असा टोला विरोधकांना लावत. पुढच्य महापालिका निवडणुकीत भाजपचे १०५ च्या पुढे नगरसेवक निवडून येतील. विरोधकांना १०० उमेदवार देखील निवडणूक लढविण्यासाठी मिळणार नाहीत अशी टीका केली. त्यावर फडणवीस यांनी बापटसाहेब तुमच्या मनासारखे होईल, असे सांगत अनुमोदन दिले.
यावेळी खा. बापट यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांनीही पुणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत त्यांचे कौतुक केले .