पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय पुणे अंतर्गत प्रशिक्षण योजनेंतर्गत मुख्यालयाच्या मंजुरीने सर्व विद्यार्थ्यांना नियमानुसार प्रशिक्षण दिलेले आहे व या संस्थेची प्रशिक्षण शुल्क प्रलंबित आहेत त्या संस्थांनी विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण नियमानुसार पूर्ण करून त्यांना प्रमाणपत्र दिले आहेत व महामंडळाच्या सर्व नियम व अटींचे पालन करूनच प्रशिक्षण पूर्ण केले आहे, अशा संस्थांनी मागणी बाबतचे प्रस्ताव आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिनांक 30 नोव्हेंबर 19 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे जिल्हा व्यवस्थापक पुणे यांनी पत्रकान्वये कळविले आहे.