पुणे-
चिंतन ग्रुपचे संस्थापक, जेष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात (वय वर्ष ६५) यांचे आज दिनांक १५ फेब्रुवारी रोजी पुणे येथे आजारपणामुळे निधन झाले.
त्यांचे पार्थिव रविवारी (दि. १६) फेब्रुवारी सकाळी ८ ते १० या वेळेत त्यांच्या राहत्या घरी (शिवसृष्टी अपार्टमेंट, शिवाजी हौसिंग सोसायटी, सेनापती बापट रोड, पुणे) येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे व अंत्यविधी सकाळी ११.०० वाजता वैकुंठ स्मशानभूमी, पुणे येथे होईल.
त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी कांचन, दोन मुले मंदार, चिंतन, स्नुषा स्वाती, जान्हवी, नात इंद्रायणी, तीन भाऊ अशोक, स्वागत, निर्मलचंद्र व चिंतन ग्रुप असा मोठा परिवार आहे.