खडकवासला भरले ६१ टक्के : मुठा कालव्यातून ५०० क्युसेस पाणी सोडले

Date:

पुणे :.गतवर्षाच्या तुलनेत बरोबरीने पाणी साठ्याकडे पुण्याची चारही धरणे भरत असून आज सायंकाळी ५ वाजता खडकवासला धरणात ६१ .५१ टक्के पाणी साठा झाला असून त्यातून नवीन मुठा उजव्या कालव्यातून ५०० क्युसेस पाणी सोडण्यात येऊ लागले आहे. शहरा सोबतच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळ पासून पावसाचा जोर ओसरला आहे. आज पाणलोट क्षेत्रात तुरळक पाऊस झाला आहे. खडकवासला १ मिमी, – पानशेत २० मिमी, वरसगाव २३ मिमी आणि टेमघरधरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३५ मिमी पावसाची नोंद झाली आहे . तर या चार धरणांत एकूण उपयुक्त पाणीसाठा ८.१९ टीएमसी झाला आहे.गतवर्षी आजच्या दिवशी ८.६६ टीएमसी एवढा साठा होता .

चारही धरणांची मिळून पाणी साठ्याची एकूण क्षमता २९. ५० टीएमसी एवढी आहे. आज या धरणात २८. ११ टक्के एवढा साठा झाला आहे. त्यातील सर्वाधिक साठा ( आपापल्या क्षमतेनुसार ) खडकवासल्यात ६१.५१ टक्के झाला आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एकूण १४८ मिमी एवढा पाउस आजपर्यंत झाला आहे आणि १.२१ टीएमसी एवढा पाणी साठा झाला आहे जो ६१ .५१ टक्के आहे . पानशेत क्षेत्रात आज २० मिमी पावसाची नोंद झाली या क्षेत्रात आजवर एकूण ६८२ मिमी एवढा पाउस झाला आहे.३.०९ टीएमसी एवढा पाणीसाठा पानशेत धरणात झाला असून तो धरणाच्या क्षमतेच्या २९ टक्के एवढा आहे.वरसगाव धरणाच्या क्षेत्रात आज २३ मिमी पाउस झाला या क्षेत्रात एकूण आजवर ६६५ मिमी एवढा पाउस झाला आहे या धरणात ३.३१ टीएमसी एवढा पाणी साठ झाला असून तो २५.८१ टक्के एवढा आहे .टेमघर मध्ये आज ३५ मिमी एवढा पाउस नोंदविला गेला , आजवर या क्षेत्रात ८०३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. टेमघर धरणात मात्र अवघा ०.५८ टीएमसी पाणीसाठा आहे .जो १५.७५ टक्के एवढाच आहे . गेल्या वर्षी याच दिवशी या चारही धरणात मिळून एकूण ८.६६ टक्के पाणी साठा होता . यंदा तो ८.१९ टक्के एवढ्यावर आहे . मध्यंतरी काही दिवसांपूर्वी गतवर्षाच्या तुलनेत सुमारे निम्म्याहून कमी पाणी साठा झाला होता. त्यानंतर सुरु झालेल्या पावसाने ही गॅप जवळ जवळ भरत आणली आहे.

Subject: khadakwasala Complex gauges 10.7.2022/5.00 pm,
Rain(mm/Total/TMC/%/Inflow/Mtr)

1)Khadakwasala –1/148/1.21/61.51%/+66/580.80
NMRBC- 500

2)Panshet-– 20/682/3.09/29.00%/+112/617.56

3)Warasgaon-
23/665/3.31/25.81%/+166/619.50

4)Temghar-
35/803/0.58/15.75%/+108/ 677.50

Total Inflow 4 Dam= 452 mcft

Total contents of 4 Dams-
8.19 TMC/28.11%
Last year-
8.66 TMC/ 29.71%

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लॉरिट्झ नुडसेनने 50 GW सौर क्षमता सक्षम असल्याचे सिद्ध केले.

जागतिक स्वच्छ ऊर्जा संक्रमणामध्ये आपल्या भूमिकेचे केले समर्थन युटिलिटी स्केल सोलर फार्म्सपासून घरांना प्रकाश देणाऱ्या रूफटॉप सिस्टीम्सपर्यंत लॉरिट्झ नूडसेन सौर घटक उत्पादन संयंत्रांना केटरिंगसह, ऊर्जा पायाभूत सुविधांसाठी आपला सात दशकांचा वारसा - स्वच्छ ऊर्जेचा लाभ बाजारपेठेतील समुदायांपर्यंत पोहोचविण्यास मदत करत आहे मुंबई, : आपल्या इलेक्ट्रिकल आणि डिजिटल तंत्रज्ञानाने संपूर्ण भारत आणि जागतिक बाजारपेठेत 50 GW पेक्षा जास्त सौरऊर्जेची क्षमता निर्माण केल्याचे भारतातील इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या लॉरिट्झ नूडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशनने आज जाहीर केले आहे. केवळ सौरऊर्जा क्षमता निर्मिती नाही तर त्या पलीकडे जाऊन अर्थपूर्ण, व्यापक उपलब्धता, कारखाने, शेत, घरे आणि सेवा उपलब्ध न होणाऱ्या समुदायांपर्यंत पोहोचणे, राष्ट्रीय ऊर्जा संक्रमणाच्या उद्दिष्टांसाठी आवश्यक विस्ताराला समर्थन देण्यासाठी सौर ऊर्जा सक्षम करण्यावर हा महत्त्वाचा टप्पा स्पष्टरित्या लक्ष केंद्रित करतो. भारताचा सौर प्रवास आता मोठ्या युटिलिटी पार्कपुरता मर्यादित राहिलेला नाही. पीएम-कुसूमद्वारे सिंचनाची उर्जा, पीएम सूर्य घर अंतर्गत कुटुंबांना सक्षम करणे आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत - पारंपारिक ग्रीडच्या आवाक्याबाहेरील समाजापर्यंत खात्रीशीर वीज पर्याय उपलब्ध करून देणे, हे देखील दिसत आहे. हे परिवर्तन अत्यंत वेगाने झाले आहे. भारताने सातत्याने सौर ऊर्जा क्षमतेत वाढ केली असून, सध्या स्थापित अक्षय्य ऊर्जा क्षमतेमध्ये सौर ऊर्जेचा वाटा जवळपास ५५% इतका आहे आणि ही क्षमता 154 गिगावॅटच्या पुढे गेली आहे. दोन समांतर मार्गांनी हा विस्तार होतो आहे: एक म्हणजे मोठ्या प्रमाणावरील युटिलिटी प्रकल्प, जे ग्रीडची क्षमता वाढवून जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करतात; आणि दुसरे म्हणजे डिस्ट्रिब्युटेड प्रकल्प, ज्यांचा थेट आर्थिक आणि सामाजिक प्रभाव पडतो. लॉरिट्झ नुडसेन ही कंपनी युटिलिटी-स्केल पॉवर प्लांट्स, कमर्शियल अँड इंडस्ट्रिज आणि निवासी क्षेत्र अशा तीन विभागांमध्ये कार्यरत आहे. प्रगत AC सोल्युशन्स, DC स्विचगिअर, स्मार्ट मीटरिंग आणि क्लाउड-आधारित रिमोट मॉनिटरिंग सोल्युशन्स कंपनी पुरवते, ज्यामुळे सौर ऊर्जा यंत्रणा सुरक्षित, विश्वसनीय आणि दीर्घकालीन कामगिरीसाठी सक्षम राहतात.या क्षमतेचा पाया भारतातील विद्युत पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात असलेल्या सात दशकांहून अधिक काळातील अनुभवावर आधारलेला आहे. कंपनीने 2,350 हून अधिक सौर ऊर्जा प्रकल्पांना सहकार्य केले आहे, 350 हून अधिक EPC कंपन्या व 300 ​​हून अधिक डेव्हलपर्ससोबत भागीदारी केली आहे, तर 300 हून अधिक सिस्टम इंटिग्रेटर्सना प्रशिक्षण दिले आहे; अशा प्रकारे या क्षेत्राच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक असलेली स्थानिक क्षमता निर्माण केली आहे. लॉरिट्झ नुडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नरेश कुमार म्हणाले: “जेव्हा एखादा शेतकरी डिझेलवर आधारित सिंचनाचा वापर सोडून देतो किंवा एखाद्या कुटुंबाला विजेचा खात्रीशीर पुरवठा मिळतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने ऊर्जा संक्रमण सुरू होते. 50 गिगावॅटच्या टप्प्याचे महत्त्व केवळ त्याच्या विस्तारामध्येच नाही, तर त्याचे फायदे किती व्यापकपणे जाणवतात यातही आहे. सौर पायाभूत सुविधा विश्वसनीय, सहज उपलब्ध आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या सेवेसाठी तयार केल्या जातील, हे सुनिश्चित करण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे.” भारताची सौर परिसंस्था जसजशी विस्तारली आहे, तसतशी तिची तांत्रिक गुंतागुंतही वाढली आहे. उच्च क्षमता, बदलती ग्रिड गतिशीलता आणि विकेंद्रित वीज निर्मिती मॉडेलच्या वाढीमुळे अधिक प्रगत, विशिष्ट वापरासाठीच्या विद्युत उपायांची गरज वाढत आहे. वीज निर्मितीपासून ते वहन आणि ग्रीडमधील एकत्रीकरणापर्यंतच्या संपूर्ण सौर मूल्य साखळीला लॉरिट्झ नुडसेन समर्थन देते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये हा बदल दिसून येतो, ज्यात मध्यम-व्होल्टेज सोल्यूशन्स, एसी आणि डीसी स्विचगियर सोल्यूशन्स, सॉफ्टवेअर आणि सेवांसह नवीकरणीय ऊर्जेशी संबंधित उत्पादनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नवीकरणीय ऊर्जेतील ही वाढ देशांतर्गत उत्पादनाचे प्रमाण देखील वाढवते आहे. आर्थिक वर्ष 2025 ते 2026 या काळात भारताच्या सौर उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ झाली, ज्यामुळे देशाचे आत्मनिर्भरत्व अधिक मजबूत झाले. गरजांनुसार तयार केलेल्या मजबूत, भविष्यासाठी सज्ज विद्युत प्रणालींनी उत्पादन सुविधा सुसज्ज करून लॉरिट्झ नुडसेनने या उत्क्रांतीला पाठिंबा दिला आहे. 2030 पर्यंत 500 गिगावॅट जीवाश्म-इंधन-विरहित क्षमतेचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने भारत वाटचाल करत असताना, आता संक्रमणाच्या प्रमाणावरून गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले जात आहे, जेणेकरून ऊर्जेची उपलब्धता केवळ विस्तारितच नव्हे, तर तिचे समान वितरणही सुनिश्चित होईल. या प्रवासात लॉरिट्झ नुडसेनची भूमिका त्यांच्या मूळ उद्देशाशी ठामपणे जोडलेली आहे: अशी एक विद्युत पायाभूत रचना उभारणे, ज्यामुळे सौर ऊर्जा विश्वसनीय आणि सहज विस्तारण्यायोग्य बनेल, तसेच भारताच्या विकासाच्या प्रवासातील प्रत्येक स्तरावर ती सुलभतेने उपलब्ध होईल.

मुठा प्रदूषणावर विधानपरिषदेत आवाज; आरएमसी धोरण सभागृहासमोर मांडावे – डॉ. नीलम गोऱ्हे

आमदारांना त्रैमासिक माहिती द्यावी मुंबई.दि.१: पुणे शहरातील रेडिमिक्स काँक्रीट (आरएमसी)...

महिलांच्या नावावरील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलतीला मंजुरी

पुणे-: पुणे महापालिका हद्दीतील फक्त महिलांच्या नावावर असलेल्या ५००...