पुणे : मराठी विज्ञान परिषद पुणे विभागातर्फे प्रीती दामले यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. ‘अवयवदानाचे महत्व‘ या विषयावर शुक्रवार, दि. १७ मे २०१९ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात हे व्याख्यान होणार आहे. सर्व विज्ञानप्रेमी नागरिकांसाठी हे व्याख्यान विनामूल्य खुले असणार आहे.
अवयवदान म्हणजे नेमके काय? कोणकोणते अवयवदान करता येतात? त्याची प्रक्रिया नेमकी कशी असते? त्यामागील वैज्ञानिक दृष्टीकोन काय आहे? कायदा काय सांगतो? समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या अवयवदानाबाबतच्या संदेशांमध्ये कितपत तथ्य असते? आपल्याला अवयवदान करायचे असल्यास कसे करावे? अवयवदान करणे आज गरजेचे का बनले आहे? अशा विविध प्रश्नांची उकल प्रीती दामले आपल्या व्याख्यानातून करणार आहेत. तेव्हा अधिकाधीक विज्ञानप्रेमी नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा व अवयवदानाच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन विज्ञान परिषदेच्या वतीने केले आहे.