श्रेय घेणारेच ओबीसी आरक्षणाच्या विरोधात होते; आमच्या सरकारचा पायगुण चांगला- शिंदे

Date:

मुंबई-”अवैध सरकार आहे. अवैध सभापती आहे. अवैध पद्धतीने विश्वासदर्शक ठराव घेतला असे म्हणणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने चपराक दिली. ठाकरे सरकारच्या चारही मागण्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. ओबीसी आरक्षणाबाबत आम्हाला कोणतेही श्रेय घ्यायचे नाही. आम्हाला श्रेयाबाबत काहीही बोलायचे नाही. जे श्रेयाबाबत बोलतात तेच आधी विरोध करीत होते.” असा टोला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लगावला.ओबीसी आरक्षणावर न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रीया दिली. त्यावेळी ते बोलत होते, त्यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर टीका करतानाच अवैध सरकार म्हणून हिनवणाऱ्यांचा समाचार घेतला.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ओबीसी प्रकरणात महत्त्वपुर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. त्यावरून ही ओबीसी समाजाचा विजय आहे. बांठिया आयोगाने जी शिफारस होती त्याप्रमाणे आम्ही काम करीत राहीलो. नगरविकास मंत्री असल्यापासून बांठीयांच्या संपर्कात होतो असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.मुख्यमंत्री म्हणाले, इम्पिरिकल डाटा आम्ही न्यायालयासमोर मांडला आहे. त्यामुळे न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. याकामासाठी सर्वांनी मदत केली आहे. सर्वांचे स्वागत करीत आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले, लोकशाहीत कायदा नियमांना महत्व असते. दोन तृतीयांश बहुमतापेक्षा जास्त बहुमत आमच्याकडे आहे त्यात आम्हाला डिटेल्समध्ये जायचे नाही ते न्यायप्रविष्ठ भाग आहे. आमच्या आमदारांमध्ये कुठलाही सम्रंभ नाही. आम्ही कुठलाही गट स्थापन केला नाही. ठाकरे गटाच्या चारही मागण्या फेटाळुन लावण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्तारासाठी कुठलीही न्यायालयीन अडचण नाही.मुख्यमंत्री म्हणाले, लोकसभेमध्ये देखील दोन तृतीयांश खासदारांनी आपले पत्र दिले आहे. आमच्याकडे बहुमत असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज दिला आहे. आमच्या आमदारांत कोणताही संम्रभ नाही. आम्ही कुठलाही गट स्थापन केला नाही. ठाकरे गटाच्या चारही मागण्या फेटाळुन लावण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्तारासाठी कुठलीही न्यायालयीन अडचण नाही.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोलंबो परिषदेसाठी काँग्रेसचे नगरसेवक सुनील शिंदे यांची निवड!

पुणे- महापालिकेतील कॉंग्रेसचे नगरसेवक आणि कामगार नेते सुनील...

राज्यात 1 ते 15 मे 2026 या कालावधीत स्व-गणना, तर घरोघरी जाऊन घरांची यादी आणि गृहगणना 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान होणार

मुंबई, महाराष्ट्र जनगणना संचालन संचालनालयाने आज मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन...

येरवड्यातील लुंबिनी उद्यानात भीमगीतांची ‘धम्म संध्या’ उत्साहात संपन्न

बुद्ध जयंतीनिमित्त माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका नंदिनी...

परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय

जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था:चेअरमन पदासाठी प्रदीप गोलांडे आणि...